तीन नवरदेवांना लुटणार सोनम

By Admin | Updated: November 27, 2014 23:29 IST2014-11-27T23:29:45+5:302014-11-27T23:29:45+5:30

अभिनेत्री सोनम कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘खुबसुरत’ हा चित्रपट अपयशी ठरला. आता ‘डॉली की डोली’ या चित्रपटात ती एक वेगळी भूमिका साकारणार आहे.

Sonam will rob three Navarves | तीन नवरदेवांना लुटणार सोनम

तीन नवरदेवांना लुटणार सोनम

अभिनेत्री सोनम कपूरचा नुकताच रिलीज झालेला ‘खुबसुरत’ हा चित्रपट अपयशी ठरला. आता ‘डॉली की डोली’ या चित्रपटात ती एक वेगळी भूमिका साकारणार आहे. सोनमने एका मुलाखतीत या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत सांगितले. ‘डॉली की डोली’ या चित्रपटात ती एका दगाबाज महिलेच्या भूमिकेत असून, तीन नवरदेवांना लुटणार आहे. चित्रपटात तिच्या पात्रचे नाव डॉली असून तिचे कामच दगाबाजी आहे. डॉलीला या कामी तिचे नकली कुटुंब साथ देते. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक डोग्राने केले असून या चित्रपटातून तो चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रत पदार्पण करीत आहे. सोनम कपूरला भरपूर चित्रपट मिळत असले, तरी तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशे चालत नाही. ‘खुबसुरत’मध्ये तिची फवादसोबतची केमिस्ट्री लोकांना आवडली खरी; पण त्याचा फायदा मात्र चित्रपटाला झाला नाही. सोनम सध्या राजश्री प्रॉडक्शनच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. चित्रपटात ती सलमान खानच्या नायिकेच्या भूमिकेत दिसेल.
 

 

Web Title: Sonam will rob three Navarves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.