हिंदू पद्धतीने नाही, तर 'असा' झाला सोनम-आनंदचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 15:27 IST2018-05-08T15:26:57+5:302018-05-08T15:27:49+5:30
सोनमच्या आनंद कारजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

हिंदू पद्धतीने नाही, तर 'असा' झाला सोनम-आनंदचा विवाह
मुंबई- बॉलिवूडची अभिनेत्री व फॅशन दिवा सोनम कपूरने प्रियकर आनंद आहुजाबरोबर लग्न गाठ बांधली. शिख पद्धतीने सोनम-आनंदचा विवाह सोहळा संपन्न झाला. सोनमच्या आनंद कारजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आनंद कारज हे हिंदू धर्माच्या विवाहच्या पद्धतीपासून पूर्णपणे वेगळं असतं. आनंद कारजची रसम सकाळी होते. पारंपरिक हिंदू विवाहांमध्ये लग्न, मुहूर्त, जन्मपत्रिका मिळवणं गरजेच असतं पण आनंद कारजमध्ये याला विशेष महत्त्व नाही. शिख धर्मात जे लोक गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवतात तेच आनंद कारज करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस पवित्र असतो.
सोनमच्या आनंद कारजचे विधी सकाळी 11 वाजता सुरू होऊन 12.30 पर्यंत चालले. लाल ओढणीच्या छायेमध्ये भाऊ हर्षवर्धन कपूर व अर्जुन कपूरने सोनमला विवाह मंडपापर्यंत आणलं. सोनमचा लग्न मंडपात पोहचण्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
6 मेपासून सोनम कपूरच्या लग्नाचे विविध कार्यक्रम मुंबईत पार पडले. 6 मे रोजी सोनमचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. 7 मे रोजी मुंबईत संगीत सोहळ्याचं आयोजन होतं. या कार्यक्रमाला बॉलिवडूमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावत डान्सफ्लोअर गाजवला. आजही लग्नाच्या दिवशी बॉलिवूडच्या जवळपास सगळ्याचं कलाकारांनी सोनमच्या लग्नाला हजेरी लावली आहे.