सोनालीचा ‘ग्लॅमरस’ लूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2015 00:05 IST2015-08-24T00:05:36+5:302015-08-24T00:05:36+5:30
‘नटरंग’मध्ये तमासगीर, ‘अजिंठा’मध्ये गावातील मुलगी, गाढवाच लग्नमध्ये साकारलेली रंभा, क्षणभर विश्रांतीमध्ये काहीशी मॉडर्न आणि काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांची प्रचंड

सोनालीचा ‘ग्लॅमरस’ लूक
‘नटरंग’मध्ये तमासगीर, ‘अजिंठा’मध्ये गावातील मुलगी, गाढवाच लग्नमध्ये साकारलेली रंभा, क्षणभर विश्रांतीमध्ये काहीशी मॉडर्न आणि काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळवलेल्या शटरमधील वेश्या या सगळ्या सोनाली कुलकर्णीच्या भूमिका निश्चितच लक्षात राहणाऱ्या आहेत. पण, कायमच वेगळं काहीतरी करायला मिळावं, ही प्रत्येकच कलाकाराची इच्छा असते. त्यानुसार सोनालीही आता आगामी चित्रपट ‘हाय काय, नाय काय’मध्ये ग्लॅमरस लुकमध्ये पाहायला मिळणार आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने प्रथमच या चित्रपटासाठी ग्लॅमरस लुकमध्ये शॉट दिल्याचे दिसून येत आहे़