...म्हणून सैफीनानं वचन मोडून को-स्टार्संना केलं किस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 13:04 IST2017-05-16T12:54:02+5:302017-05-16T13:04:01+5:30

बॉलिवूडची "बेबो" करीना कपूर आणि "छोटे नवाब" सैफ अली खाननं को-स्टार्संना नो किस करण्याचं वचन मोडीत काढलं आहे, कारण...

... so Saifen broke the promise and kissed the co-stars | ...म्हणून सैफीनानं वचन मोडून को-स्टार्संना केलं किस

...म्हणून सैफीनानं वचन मोडून को-स्टार्संना केलं किस

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 16 - बॉलिवूडची "बेबो" करीना कपूर आणि "छोटे नवाब" सैफ अली खान 2012 साली विवाहबंधनात अडकले. यानंतर करीना आणि सैफनं ठरवले होते की, सिनेमांमध्ये काम करताना आपल्या कोणत्याही को-स्टारसोबत किसिंग सीन करणार नाहीत. मात्र, गेल्या वर्षीच बॉक्सऑफिसवर झळकलेल्या ""की अँड का"" सिनेमामध्ये काहीतरी भलतंच नजरेस पडले. 
 
या सिनेमाममध्ये करीनाच्या पतीची भूमिका अभिनेता अर्जुन कपूरनं साकारली होती. सिनेमामध्ये करीनानं अर्जुनसोबत किसिंगचा सीन दिला होता. एवढंच नाहीतर सैफनंही ""रंगून"" सिनेमातही अभिनेत्री कंगना राणौतसोबत किसिंग दिले होते. 
 
मग नेमके असे काय घडले की सैफीनानं त्यांच्या ऑनस्क्रीन किस करारसंदर्भातील आपलं वचनच मोडीत काढलं? तर याचे उत्तर आता सर्वांसमोर आले आहे. हा निर्णय घेण्यामागे ""सारा अली खान""चा हात आहे. तिनं या दोघांमध्ये भांडण लावलं आहेत का? म्हणून या दोघांनी आपला ""किसवचन"" मोडीत काढलं का?, असे तुमच्या डोक्यात विचार सुरू झाले असतील तर जरा थांबा. मात्र या निर्णयामागे साराच आहे, हे आम्ही नाही हो, खुद्द करीनानं सांगितले आहे.
 
करीनाने सांगितले की, सैफ व मी हा बदल करण्याचा निर्णय मुलगी सारा अली खानमुळे घेतला. ऑनस्क्रीन कोणत्याही को-स्टारसोबत किसिंग सीन देण्यात समस्या नसावी, असा सारा आम्हाला म्हणाली. म्हणूनच करीना आणि सैफनं अन्य सीनप्रमाणे  किसिंग सीनलाही वागणूक द्यावी, असा सारानं दिलेला सल्ला आईबाबा सैफीनानं मान्यही केला. 
 
(करण नव्हे, सलमान करणार सारा अली खानला लाँच)
दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र  या सर्व चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडचा दबंग सलमान खान मेहुणा आयुष शर्मा आणि साराला एकत्र लाँच करणार आहे. 
 
या नव्या प्रोजेक्टबद्दल सलमान लवकरच साराशी चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साराने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून, ही एक प्रेमकथा आहे. करण जोहर साराला लाँच करणार असल्याची चर्चा होती पण यात तथ्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुष आणि साराची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल अशीही ही चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. 
 
चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक यासंबंधी अद्याप काहीही ठरलेले नाही. सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सारा अली खान आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू वीर पाहरिया हे दोघे डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 

Web Title: ... so Saifen broke the promise and kissed the co-stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.