म्हणून... टायगरकडून डान्स शिकतोय नवाजुद्दीन

By Admin | Updated: June 5, 2017 15:57 IST2017-06-05T15:57:18+5:302017-06-05T15:57:18+5:30

मुन्ना मायकल हा बॉलिवूडचा पहिला अ‍ॅक्शन-डान्स चित्रपट असल्याचे चित्रपट निर्मात्याचं मत आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मायकल जॅक्सनला श्रद्धांजली देताना दिसेल.

So ... Najazuddin is learning dance from Tiger | म्हणून... टायगरकडून डान्स शिकतोय नवाजुद्दीन

म्हणून... टायगरकडून डान्स शिकतोय नवाजुद्दीन

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 5 - टायगर श्रॉफ आणि नवाजुद्दीनच्या बहुप्रतिक्षीत मुन्ना मायकल या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. मुन्ना मायकल हा बॉलिवूडचा पहिला अ‍ॅक्शन-डान्स चित्रपट असल्याचे चित्रपट निर्मात्याचं मत आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ मायकल जॅक्सनला श्रद्धांजली देताना दिसेल.
ट्रेलरमध्ये टायगर जबरदस्त अ‍ॅक्शन आणि डान्स करताना दिसतोय. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी प्रथमच डान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात नवाज खलनायक साकारतो आहे. या ट्रेलरवरुन चित्रपटात प्रमाचा त्रिकोण असल्याचे दिसतेय. नवाजने एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीची भूमिका केली आहे. तसेच ट्रेलरमध्ये टायगर नवाजला डान्स शिकवत असल्याचे दिसतेय.
मुन्ना मायकलमध्ये टायगर स्ट्रिट डान्सर बनला आहे. लहानपणी रस्त्यांवर नाचून पैसे गोळा करणा-या टायगरला एक दिवस नॅशनल डान्स कॉम्पिटीशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्याचे नशीब एकदम कलाटणी घेते, अशी ही कथा आहे. मुन्ना मायकल हा साबीर खानसोबतचा टायगरला तिसरा चित्रपट आहे. याआधी साबीरच्या हिरोपंती आणि बागीमध्ये टायगर दिसला आहे.
सब्बीर खान दिग्दर्शित या चित्रपटात टायगर श्रॉफ हा मायकल जॅक्सनचा खूप मोठा चाहता बनला आहे. ज्याचे लहानपण मुंबईच्या रस्त्यांवर गेले आहे. या चित्रपटात टायगरसोबत निधी अग्रवाल बॉलिवूड डेब्यू करते आहे. येत्या 21 जुलैला चित्रपटगृहांत येणा-या या चित्रपटाचे दोन पोस्टर आजच रिलीज करण्यात आले. ट्रेलर रिलीज होण्याच्या काही तास आधी रिलीज करण्यात आलेल्या या पोस्टरमध्ये टायगर एकदम हटक्या अवतारात दिसतो आहे.

ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

Web Title: So ... Najazuddin is learning dance from Tiger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.