सिंगल सेलिब्रिटी मदर
By Admin | Updated: April 7, 2016 01:03 IST2016-04-07T01:03:43+5:302016-04-07T01:03:43+5:30
पालकत्वाची ओेढ ही फार नैसर्गिक गोष्ट असली, तरी पालकत्वाची जबाबदारी सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच आपल्याकडे आई-वडील म्हणजे पालक अशी व्यवस्था तयार झाली आहे

सिंगल सेलिब्रिटी मदर
पालकत्वाची ओेढ ही फार नैसर्गिक गोष्ट असली, तरी पालकत्वाची जबाबदारी सांभाळणे ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच आपल्याकडे आई-वडील म्हणजे पालक अशी व्यवस्था तयार झाली आहे. दोघांनी मिळून बाळाचा सांभाळ करणे, या व्यवस्थेत अपेक्षित आहे, परंतु अनेकदा ही अपेक्षित गोष्ट घडत नाही अन् कुणातरी एकाला एकहाती मुलांचा सांभाळ करावा लागतो. त्यातही ही जबाबदारी एखाद्या महिलेवर असेल आणि ती फिल्म सेलिब्रिटी असेल तर तिच्यासाठी हे आव्हान फारच मोठे असते, परंतु बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी हे आव्हान लीलया पेलले आहे. त्यांची ही खास ओळख....
4करिष्मा कपूर
करिष्माला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ती त्यांच्यासोबत नेहमी आनंदाने राहते. संजय कपूर या आपल्या पतीसोबत घटस्फोटाचा तिचा लढा सुरूच आहे. आपल्या मुलांना वाढविण्याची तिची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. मुलांच्या संगोपनासाठी दोन पावले मागे यावे लागते, तेव्हाच आयुष्य आनंदाने जगता येते, असा जणू संदेशच तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
4उर्वशी ढोलकिया
छोट्या पडद्यावरची ‘कोमलिका’ अर्थात उर्वशी ढोलकियाची कहाणीही खूप वेगळी आहे. वयाच्या १६ वर्षी तिचे लग्न झाले. १७ व्या वर्षी तिला जुळे झाले. काही कालावधीनंतर ती आपल्या पतीपासून वेगळी झाली. वयाच्या १९ व्या वर्षांपासून ती आपल्या मुलांना सांभाळत आहे. या दरम्यान अनेक संकटांचा सामना तिला करावा लागला, पण ती डगमगली नाही.
4कामया पंजाबी
प्रत्युषा बॅनर्जीच्या प्रकरणामुळे जिचे नाव सध्या चर्चेत आहे, ती टी. व्ही. मालिकांमध्ये चेटकीण म्हणून काम करणारी कामया पंजाबी हीसुद्धा एकटीच आईची भूमिका निभावतेय. बंटी नेगी या पतीशी घटस्फोट घेऊन ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये आली होती. सध्या मुलगी आरासोबत ती खूश आहे.4नीना गुप्ता
नीता गुप्ताची प्रेरणादायी कथा सर्वांनाच माहिती आहे. १९८९ साली तिने एका मुलीला जन्म दिला. त्या काळी येथील व्यवस्थेशी लढताना तिला किती त्रास झाला असेल तिलाच माहीत. आपली मुलगी मसाबाला मोठे करताना तिने खूप कष्ट घेतले. मसाबा सध्याची सर्वात लोकप्रिय फॅशन डिझायनर आहे.
4श्वेता तिवारी
अत्यंत वाईट पद्धतीने तिला घटस्फोट स्वीकारावा लागला. हे सर्व प्रकरण माध्यमांमधून खूप चर्चिले गेले. पूर्वीच्या पतीसोबतच्या तणावपूर्ण संबंधानंतर श्वेताने नुकताच पुनर्विवाह केला. तत्पूर्वी तिने पलक या आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. आपल्या वैवाहिक आयुष्यातील तणावाचा तिच्यावर काहीही परिणाम होऊ दिला नाही. गेली अनेक वर्षे तिने एकटीने तिला सांभाळले. दूरचित्रवाणी उद्योगात राहून स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सक्षम केले.
4सुष्मिता सेन
सुष्मिता सेन ही स्वत:च एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. तिने परंपरा मोडताना केवळ एकच नव्हे तर दोन मुली दत्तक घेतल्या, त्यांना मोठे केले. या दोन मुलींना सांभाळताना हे परिपूर्ण कुटुंब असल्याचे जाणवते. जोडीदाराशिवाय मातेची भूमिका बजावताना सुष्मिताने एकट्या राहणाऱ्या मातांना यातून प्रेरणा दिली आहे.