गायक मिका सिंग पुढील वर्षी अडकणार विवाहबंधनात

By Admin | Updated: May 29, 2016 15:48 IST2016-05-29T15:48:49+5:302016-05-29T15:48:49+5:30

गायक मिका सिंह याने पुढील वर्षी आपण बोहल्यावर चढणार असल्याची आनंदाची बातमी खुद्द आपल्या चाहत्यांना दिली आहे. मिकाने ही घोषणा सा रे ग म प या रिअलिटी शोच्या वेडिंग स्पेशल भागादरम्यान केली आहे

Singer Mika Singh will be arrested next year | गायक मिका सिंग पुढील वर्षी अडकणार विवाहबंधनात

गायक मिका सिंग पुढील वर्षी अडकणार विवाहबंधनात

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ :  बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक मिका सिंह याने पुढील वर्षी आपण बोहल्यावर चढणार असल्याची आनंदाची बातमी खुद्द आपल्या चाहत्यांना दिली आहे. मिकाने ही घोषणा सा रे ग म प या रिअलिटी शोच्या वेडिंग स्पेशल भागादरम्यान केली आहे. तो या शोमध्ये परीक्षकाची भूमिका बजावत असून या बातमीला दुजोरा देत त्याने हे खरे असल्याचे कबूल केले आहे. आपापले वैवाहिक जीवनातील अनुभव यावेळी सर्व परीक्षकांनी कथन केले, आपण हा निर्णय यातून प्रेरणा मिळाल्याने घेतल्याचे तो म्हणाला.
 
आयुष्याचे क्षण कोणासोबत तरी व्यतित करण्याची वेळ आली असल्याचे आपल्याला वाटत असल्याची भावना त्याने व्यक्त केली. पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचेदेखील तो म्हणाला. आपल्या भावी जीवनसाथीविषयी अधिक काही न बोलणाऱ्या मिकाचे नाव बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींशी जोडले गेले आहे. राखी सावंतसोबतदेखील त्याचे नाव जोडले गेले होते. असे असले तरी, आपल्याला एक चांगली जीवनसाथी मिळावी अशी त्याची इच्छा आहे.
 
मागील काही दिवसापुर्वी केआरकेने आपल्या ट्विटर हँडलवर मिका आणि उर्वशी रौतेला लग्न करणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. उर्वशी रौतेला आजकाल मीका सिंहच्या घरी जास्त वेळ घालवते आणि ते लवकरच लग्न करणार असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 
 

Web Title: Singer Mika Singh will be arrested next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.