सिद्धार्थला हवे आहे मुंबईत घर
By Admin | Updated: November 9, 2014 23:37 IST2014-11-09T23:37:08+5:302014-11-09T23:37:08+5:30
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वांद्रे भागातील एका भाड्याच्या घरात राहतो. ‘

सिद्धार्थला हवे आहे मुंबईत घर
अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वांद्रे भागातील एका भाड्याच्या घरात राहतो. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’च्या यशानंतर तो दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाला आहे. त्याचे हे घर समुद्राच्या जवळ असून सिद्धार्थ गेल्या दोन वर्षांपासून तेथे राहतोय. आता मात्र त्याला स्वत:चे घर खरेदी करण्याची इच्छा आहे. सिद्धार्थ गेल्या काही महिन्यांपासून घराच्या शोधात आहे. एवढेच नव्हे, तर ‘एक विलेन’नंतर मिळालेल्या काही दिवसांच्या ब्रेकमध्येही तो हेच काम करताना दिसला.