सिद्धांत कपूर पुढील वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

By Admin | Published: December 28, 2016 03:26 AM2016-12-28T03:26:32+5:302016-12-28T03:26:32+5:30

सध्या नाताळामुळे बॉलिवूड सेलिब्रेटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. अभिनेता सिद्धांत कूपरवरसुद्धा ख्रिसमस फिव्हर चढलेला आहे. आगामी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या जीवनावर

Siddharth Kapoor's next visit to the audience next year | सिद्धांत कपूर पुढील वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

सिद्धांत कपूर पुढील वर्षी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

googlenewsNext

सध्या नाताळामुळे बॉलिवूड सेलिब्रेटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहे. अभिनेता सिद्धांत कूपरवरसुद्धा ख्रिसमस फिव्हर चढलेला आहे. आगामी दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘हसीना’मध्ये डॉनच्या भूमिकेत दिसणाऱ्या सिद्धांतने मागच्या वर्षीच्या नाताळाच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या वर्षी तो ख्रिसमसच्या काळात ‘बॉम्बैरिया’ नावाच्या सिनेमाची शूटिंग करीत होता. या कॉमेडी चित्रपटात तो ‘आंगडिया’च्या भूमिकेत आहे. अंगडिया म्हणजे खासगी कुरिअर. गुजरातमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार करणारे व्यापारी आपल्या पैशांचे व्यवहार करण्यासाठी या आंगडियाचा वापर करतात. नोटबंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाल्याचे त्याला वाटते. तो म्हणतो, ‘मी अनेक आंगडियांना ओळखतो. नोटबंदीमुळे त्यांच्या व्यवसायावर जबरदस्त परिणाम झालेला आहे. कोट्यवधींच्या वस्तंूची ने-आण करणाऱ्या आंगडियांना तुटपुंजेकमिशन मिळते. शिवाय लुटमारीचा धोका वेगळाच. केवळ पारंपरिक आंगडिया असण्याचा अभिमान बाळगून ते हा धोका पत्कारतात. गेल्या अनेक शतकांपासून हीरे व्यापाऱ्यांच्या सेवेत असणाऱ्या या आंगडियांना सणोत्सवाच्या काळात आपण विसरू नये.’ सिद्धांतने ‘बॉम्बैरिया’ची शूटिंग पूर्ण केली असून पुढील वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये राधिका आपटे, अक्षय ओबेरॉय, आदिल हुसैन, रवी किशन, अमित सियाल आणि शिल्पा शुक्ला यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तो सध्या त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत ‘हसीना’ चित्रपटामध्ये काम करण्यात व्यस्त आहे. खऱ्या आयुष्यातील हे बहीण-भाऊ हसीना आणि दाऊद इब्राहिम यांच्या भूमिका साकरत आहेत.

Web Title: Siddharth Kapoor's next visit to the audience next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.