श्री-जान्हवीला कन्यारत्न

By Admin | Updated: January 16, 2016 04:44 IST2016-01-16T04:44:28+5:302016-01-16T04:44:28+5:30

बाहुबली या दाक्षिणात्य चित्रपटाबाबत उपस्थित झालेल्या ‘कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा?’ या प्रश्नाइतकंच श्री आणि जान्हवीला बाळ कधी होणार? या प्रश्नानंही प्रेक्षकांना इतके

Shree-Jhanwila Kanya Ratna | श्री-जान्हवीला कन्यारत्न

श्री-जान्हवीला कन्यारत्न

बाहुबली या दाक्षिणात्य चित्रपटाबाबत उपस्थित झालेल्या ‘कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा?’ या प्रश्नाइतकंच श्री आणि जान्हवीला बाळ कधी होणार? या प्रश्नानंही प्रेक्षकांना इतके दिवस भेडसावलं होतं. पण आता श्री-जान्हवीचं कोडं सुटलं आहे. लवकरच निरोप घेणाऱ्या ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील श्री-जान्हवीला त्यांच्या आणि सर्वांच्याच इच्छेनुसार कन्यारत्न झालं आहे.
श्री-जान्हवीच्या या लेकीच्या बारशाने या बहुचर्चित मालिकेचा समारोप होणार आहे. २३ जानेवारी रोजी प्रक्षेपित होणाऱ्या शेवटच्या भागात हे पाहता येईल. गेली अडीच वर्षे ही मालिका सुरू आहे; पण काही महिन्यांपासून ‘काहीही हं श्री’ आणि ‘जान्हवीला बाळ कधी होणार?’ या दोन डायलॉग्सनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. पण आता तरी हा दंगा शांत होईल, अशी अपेक्षा आहे.
मधील कालावधीत काहीशी उतरती कळा या मालिकेला लागली होती; पण त्यानंतर पुन्हा एकदा गिअर टाकत जान्हवीचा स्मृतिभ्रंश, नऊ महिन्यांपासून अधिक काळ लांबलेली तिची डिलीव्हरी, पिंट्याचं लग्न, खलनायिका असलेल्या जान्हवीची आई म्हणजेच शशिकलाचा छळवादी स्वभाव, नवीन सुनेला छळणे अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या एपिसोड्सनी मालिकेला वेगळे वळण दिले आणि आता कन्यारत्नाच्या बारशाने या मालिकेच्या वळणांना व उधाण आलेल्या चर्चांना २३ तारखेला पूर्णविराम मिळणार आहे.

Web Title: Shree-Jhanwila Kanya Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.