लहान मुलांच्या कहाणीचे रीअल लोकेशनवर शूट

By Admin | Updated: February 14, 2016 02:17 IST2016-02-14T02:17:26+5:302016-02-14T02:17:26+5:30

बालसुधारगृहातील मुलांचे भावविश्व रेखाटणाऱ्या ‘आयना का बायना’ नंतर पुन्हा एकदा छोट्यांनाच केंद्रस्थानी ठेवत दिग्दर्शक समित कक्कड ‘हाफ तिकिट’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.

Shoot the children's story at the real location | लहान मुलांच्या कहाणीचे रीअल लोकेशनवर शूट

लहान मुलांच्या कहाणीचे रीअल लोकेशनवर शूट

बालसुधारगृहातील मुलांचे भावविश्व रेखाटणाऱ्या ‘आयना का बायना’ नंतर पुन्हा एकदा छोट्यांनाच केंद्रस्थानी ठेवत दिग्दर्शक समित कक्कड ‘हाफ तिकिट’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. आजवर अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती व प्रस्तुती करणारे नानूभाई जयसिंघानी या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. नानूभाई म्हणाले, ‘‘या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्व शूटिंग हे रिअल लोकेशनवर करत आहोत. एकही सिन स्टुडिओमध्ये केला नाही. चांगल्या विषयाच्या चित्रपटासाठी व्हिडीओ पॅलेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘हाफ तिकीट’च्या निमित्ताने एक आशयघन विषय मांडला जाणार आहे.’’ वेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांनी यापूर्वी बालसुधारगृहातील लहान मुलाचं भावविश्व रेखाटलं होत. या चित्रपटाने १८ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करीत आपली मोहोर उमटवली होती. प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे, गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी. व्ही. प्रकाश यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या कथा विषयाबाबत गुप्तता पाळली जात आहे.

Web Title: Shoot the children's story at the real location

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.