"ती एक कडक शिस्तीची आहे...", राज मोरेनं सांगितला तेजश्री प्रधानसोबतच्या कामाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:56 IST2025-08-08T16:55:58+5:302025-08-08T16:56:38+5:30

Veen Doghatali Tutena Serial : 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज मोरे भावा बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे.

"She is a strict disciplinarian...", Raj More shared his experience of working with Tejashree Pradhan in Veen Doghatali Tutena Serial | "ती एक कडक शिस्तीची आहे...", राज मोरेनं सांगितला तेजश्री प्रधानसोबतच्या कामाचा अनुभव

"ती एक कडक शिस्तीची आहे...", राज मोरेनं सांगितला तेजश्री प्रधानसोबतच्या कामाचा अनुभव

अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) लवकरच 'वीण दोघातली ही तुटेना' (Veen Doghatli Tutena) या नवीन मालिकेतून भेटीला येणार आहे. नुकतेच या मालिकेतील पात्रांची ओळख करुन देण्यात आली. या मालिकेतील कथा जशी भावनिक आणि गुंतवून ठेवणारी आहे, तशीच या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांमधील ऑफस्क्रीन नातसुद्धा विशेष लक्षवेधी ठरत आहे. अभिनेता राज मोरे याने नुकतेच एका मुलाखतीत तेजश्री प्रधानसोबत काम करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान आणि राज मोरे भावा बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. तेजश्री प्रधान (ताई) कडून मिळालेला  सल्ला आणि सहकार्य यामुळे टीममध्ये एक सकारात्मक ऊर्जा जाणवत असल्याचे राजने सांगितले. राज म्हणाला की, "आमच्या शूटला जास्त दिवस नाही झालेत, पण माझा आणि  तेजश्री ताईचा ऑफस्क्रीन बॉण्ड खूप छान झाला आहे. ती एक कडक शिस्तीची आहे हे मला इतक्या दिवसात तिच्या सोबत काम करून कळलं आहे. ती मला सांगते कि आपण असं करू म्हणजे सीन अजून फुलून येईल, ती तांत्रिकदृष्ट्या चांगला सल्ला देते. जसं कधी एखादा  शब्द घ्यायचा असतो तर तिला तो छान सुचतो आणि त्याचा मलाही खूप फायदा होतो. मला एक परफेक्ट सीनियरप्रमाणे तेजश्री ताईचं मार्गदर्शन मिळतंय, ज्याचा एक कलाकार म्हणून खूप फायदाही होत आहे." 

''गोष्ट खूप सुंदर लिहली आहे आणि...''

"तेजश्री ताई खात्री करते की फक्त तिचे कामच नाही तर आमच्या सर्वांचे कामही छान व्हायला हवं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न असतात, कारण सगळं छान असेल तर शो भरभराटीला येईल. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवले आहे की ती माझ्यासाठी लग्न करत आहे, आणि मालिकेत तुम्हाला ते बघायला मिळेल की काय हट्ट आहे जो मी तिच्याकडे करतो आणि तिला लग्न करावे लागत. गोष्ट खूप सुंदर लिहली आहे आणि मी आवर्जून सांगेन की मालिका तुम्ही नक्की बघा.", असे राज मोरेने सांगितले. 'वीण दोघातली ही तुटेना' ११ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळेल.

Web Title: "She is a strict disciplinarian...", Raj More shared his experience of working with Tejashree Pradhan in Veen Doghatali Tutena Serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.