शशांक केतकर "या" सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By Admin | Updated: June 12, 2017 19:59 IST2017-06-12T19:59:15+5:302017-06-12T19:59:15+5:30
होणार "सून मी या घरची" या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर छोट्या पडद्यावर य़श मिळाल्यानंतर मोठ्या पडद्याकडे वळला आहे.

शशांक केतकर "या" सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 12 - होणार "सून मी या घरची" या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर छोट्या पडद्यावर य़श मिळाल्यानंतर मोठ्या पडद्याकडे वळला आहे. वन वे तिकिट या चित्रपटात काम केल्यानंतर आता तो पुन्हा एकदा एका चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारणार आहे.
शशांक केतकरचा हा मराठी चित्रपट असून या चित्रपटाचे पोस्टर त्याने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलं आहे. भगवत गीता असं या चित्रपटाचं नाव आहे. पोस्टरमध्ये नायक-नायिकेचे चेहरे आपल्याला ओळखता येत नाहीयेत. अंकुर अरुण काकतकर यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील नायक शशांक असणार हे नक्की झालंय मात्र त्याच्यासोबत नायिका कोण आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
या पोस्टरमध्ये नायक-नायिकेशिवाय एक कुरिययरची गाडी दिसत असून प्यार कभी एक तरफा नही होता, पनवती, फोन प्रेम, विद्या कृष्ण वासुदेव यांसारखे शब्द पोस्टरवर लिहीले आहेत.
शशांकने सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर केल्यापासून शशांकसोबतची ती नायिका कोण याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.