शाहरूखसमोर स्वप्निल ‘नो वे’
By Admin | Updated: September 2, 2015 00:25 IST2015-09-02T00:25:00+5:302015-09-02T00:25:00+5:30
एखादा हिंदी बिग बजेटचा म्हणजे शाहरूख, सलमान किंवा आमीर खान यांचा चित्रपट येणार असेल तर भले भले निर्माते त्यांच्याबरोबरीने चित्रपट प्रदर्शित करण्याचे शक्यतो टाळतात,

शाहरूखसमोर स्वप्निल ‘नो वे’
एखादा हिंदी बिग बजेटचा म्हणजे शाहरूख, सलमान किंवा आमीर खान यांचा चित्रपट येणार असेल तर भले भले निर्माते त्यांच्याबरोबरीने चित्रपट प्रदर्शित करण्याचे शक्यतो टाळतात, पण मराठी निर्माते हे तत्त्व काहीसे पाळत नसल्यामुळे त्याचे परिणाम भोगावे लागतात. आता हेच पाहा ना, निर्माता-दिग्दर्शक संजय जाधव यांचा ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ चित्रपट गेल्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित झाला. पण त्याचदरम्यान शाहरूख खानचा ‘हॅपी न्यू ईअर’ रिलिज झाला आणि सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी अशी जबरदस्त स्टारकास्ट असूनही तो चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटला. त्यामुळे की काय संजय जाधव यांनी मोठी कुठलीही बिग बजेट फिल्म आसपास प्रदर्शित तर होत नाही ना, हे पाहूनच ‘तू ही रे’ चित्रपट प्रदर्शित करीत आहेत. संजय जाधव म्हणतात, शाहरूखसमोर मराठीतल्या शाहरूख अर्थात स्वप्निल जोशीला उभे करणे ही घोडचूकच होती. हॅपी न्यू ईअरमध्ये हिंदीमधली तगडी स्टारकास्ट होती. मराठी प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली यात त्यांची चूक नाही. सणासुदीला मराठी माणसे शक्यतो घराबाहेर पडत नाहीत. यातच लव्हस्टोरीचा शेवट आनंदी व्हावा, अशी अपेक्षा असते, मात्र माझी फिल्म शोकांतिका होती. ती सुखान्त होणं आवश्यक होतं. जेव्हा अनेकांना चित्रपटाचा शेवट कळला, तेव्हा सई-स्वप्निलच्या फॅन्सनी चित्रपटाकडे अक्षरश: पाठ फिरवल्याची कबुलीही त्यांनी दिली.