शाहरूख-सलमान २०२० मध्ये येणार एकत्र!
By Admin | Updated: July 3, 2017 05:42 IST2017-07-03T05:42:23+5:302017-07-03T05:42:23+5:30
एकेकाळचे जानी दुश्मन अन् आता झालेले जीवलग मित्र शाहरूख खान आणि सलमान खान यांनी पुन्हा एकदा एकत्र झळकावे अशी त्यांच्या

शाहरूख-सलमान २०२० मध्ये येणार एकत्र!
एकेकाळचे जानी दुश्मन अन् आता झालेले जीवलग मित्र शाहरूख खान आणि सलमान खान यांनी पुन्हा एकदा एकत्र झळकावे अशी त्यांच्या चाहत्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची अपेक्षा आहे. आता ही अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता असून, हे दोघे २०२० मध्ये एकत्र स्क्रीन शेअर करताना बघावयास मिळणार आहेत. हे आम्ही नाही तर दस्तुरखुद्द किंग शाहरूख खानने सांगितले आहे. एका मुलाखतीत बोलताना शाहरूख म्हटला की, ‘आम्ही एकत्र काम करावे अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. परंतु, सध्या सलमान, आमिर आणि मी आम्ही तिघेही आपापल्या चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने एकत्र येण्याचा विचार केला नाही. परंतु, सलमान आणि मला जर पडद्यावर बघायचे असेल तर त्यासाठी २०२० पर्यंत प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल, असे शाहरूखने म्हटले. सध्या शाहरूख खान त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा चौथा मिनी ट्रेलर अलीकडेच रिलीज करण्यात आला. चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा स्क्रीन शेअर
करणार आहे.