लंडनहून उशिरा परतला शाहीद
By Admin | Updated: November 28, 2014 23:26 IST2014-11-28T23:26:02+5:302014-11-28T23:26:02+5:30
बॉलीवूडचा चॉकलेट हीरो शाहीद कपूर सध्या त्याच्या ‘शानदार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘शानदार’चे काही चित्रीकरण नुकतेच लंडनमध्ये पार पडले.

लंडनहून उशिरा परतला शाहीद
बॉलीवूडचा चॉकलेट हीरो शाहीद कपूर सध्या त्याच्या ‘शानदार’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ‘शानदार’चे काही चित्रीकरण नुकतेच लंडनमध्ये पार पडले. शाहीदने शूटिंगदरम्यान ब्रिटिश म्युङिायम पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. इच्छेप्रमाणोच शूटिंगचे शेडय़ूल संपताच तो हे म्युङिायम पाहायला गेला. त्यामुळे तेथून स्वदेशी परतण्यासाठी त्याला एक दिवस उशीर झाला. ब्रिटिश म्युङिायमच्या कोत्रो या भागात शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकाचा पहिला अंक ठेवण्यात आला आहे. शाहीदने नुकतेच हॅम्लेटने प्रेरित असलेल्या असलेल्या ‘हैदर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यामुळेच शाहीद हॅम्लेटचा पहिला अंक पाहण्यास उत्सुक होता. ‘हैदर’मुळे शाहीद कपूरला एक चांगला अभिनेता म्हणून ओळख मिळाली आहे. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नसले, तरी त्याची भूमिका मात्र अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.