युक्ता व तुली यांच्या समझोता
By Admin | Updated: May 14, 2014 11:57 IST2014-05-13T21:50:14+5:302014-05-14T11:57:02+5:30
मिस वर्ल्ड युक्ता मुखी व तिचा पती प्रिन्स तुली यांच्यात समझोता झाला असून हे दोघेही एकमेकांविरोधात विविध न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यास तयार झाले आहेत़

युक्ता व तुली यांच्या समझोता
मुंबई : मिस वर्ल्ड युक्ता मुखी व तिचा पती प्रिन्स तुली यांच्यात समझोता झाला असून हे दोघेही एकमेकांविरोधात विविध न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारी मागे घेण्यास तयार झाले आहेत़
गेल्यावर्षी युक्ताने प्रिन्स व त्यांच्या कुटुंबियांविरोधात विश्वासघाताचा गुन्हा नोंदवला होता़ तर प्रिन्स हे अनैर्सगिक शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत असल्याची स्वतंत्र तक्रारही युक्ताने दाखल केली होती़ यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून प्रिन्स व त्यांच्या कुटुंबियांनी सत्र न्यायालयात धाव घेतली़ तेथे त्यांना जामीन मंजूर झाला़ याविरोधात युक्ताने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ तसेच हा गुन्हा रद्द करण्यास प्रिन्सच्या कुटुंबियांनी स्वतंत्र याचिका दाखल केली़ त्यावरील सुनावणीत वरील माहिती न्यायालयाला देण्यात आली़ (प्रतिनिधी)