कामाबाबत गंभीर हनी सिंह
By Admin | Updated: August 19, 2014 22:36 IST2014-08-19T22:36:06+5:302014-08-19T22:36:06+5:30
रॅपर हनी सिंहने बॉलीवूडमध्ये एक गायक म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. दिग्गज स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत त्याने काम केले आहे

कामाबाबत गंभीर हनी सिंह
रॅपर हनी सिंहने बॉलीवूडमध्ये एक गायक म्हणून त्याची ओळख निर्माण केली आहे. दिग्गज स्टार अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांच्यासोबत त्याने काम केले आहे. अक्षय कुमारसाठी त्याने अनेक गाणी गायली आहेत. फिल्म उद्योगाने त्याला स्वीकारल्याने हनी सिंह खुश आहे. हनी म्हणतो, ‘मी आजवर जे काही मिळवले, त्याचे श्रेय आई आणि मदत करणा:या प्रत्येक व्यक्तीला देऊ इच्छितो. मी वर्षभरात चार-पाच गाणी करतो. लोकांना माझी गाणी आवडतात याचा मला आनंद आहे. आयुष्यातील संघर्ष कधी संपत नाही. मी माङया कामाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. मी आताही प्रत्येक गाण्यावर खूप मेहनत करतो, नेहमीच पहिल्यापेक्षा चांगले करण्याचा प्रयत्न करत असतो.’