बिग बजेट चित्रपटांची मालिका सुरू

By Admin | Updated: March 31, 2015 02:12 IST2015-03-31T02:12:34+5:302015-03-31T02:12:34+5:30

गेले दोन महिने वर्ल्डकप मॅचेस असल्याने कोणतेही बिग बजेट चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाले नव्हते. जे प्रदर्शित झाले त्यापैकी कोणताही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाहीत.

The series of Big Budget films started | बिग बजेट चित्रपटांची मालिका सुरू

बिग बजेट चित्रपटांची मालिका सुरू

गेले दोन महिने वर्ल्डकप मॅचेस असल्याने कोणतेही बिग बजेट चित्रपट या शुक्रवारी प्रदर्शित झाले नव्हते. जे प्रदर्शित झाले त्यापैकी कोणताही चित्रपट फार मोठे यश मिळवू शकले नाहीत. मात्र आता वर्ल्डकपचा बहर ओसरल्यानंतर या शुक्रवारी यशराज कंपनीचा ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दिवाकर बॅनर्जीच्या दिग्दर्शनात बनलेल्या आणि हेरगिरीवर आधारित असलेल्या या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ४०च्या जमान्यातील हेरगिरीवर आधारित असलेला चित्रपट आहे. याआधी यावर मालिकेची निर्मितीही केली गेली होती. बॉक्स आॅफिसवर याआधी प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट आपटल्याने त्याचा पुरेपूर फायदा ब्योमकेश बक्षी चित्रपटाला मिळू शकतो. तसेच सुशांत सिंह राजपूत हेही एक आकर्षणाचे कारण आहे.
गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेले सर्वच चित्रपट बी ग्रेडचे होते. ते पहिल्या दिवशीच आपटले. तर त्याआधी प्रदर्शित झालेला वासूगिरीवर आधारित असलेल्या ‘हंटर’ चित्रपटाने ९ कोटींच्या आसपास कमाई केली आहे. या चित्रपटाचे बजेट खूप कमी होते. त्यामुळे ही कमाई चांंगली असल्याचे सांगितले जात आहे. तर 'दिल्लीवाली जालीम गर्लफ्रेंड’ चित्रपट तर साफ आपटला. त्याची कमाई फक्त १ कोटी झाली.
अनुष्का शर्माच्या एनएच १० या चित्रपटाची तीन आठवड्यांची कमाई २८ कोटी तर यशराजच्या ‘दम लगाके हईशा’ चित्रपटाने २८ कोटी कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांना सरासरी प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: The series of Big Budget films started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.