विद्याच्या आनंदामागचे रहस्य
By Admin | Updated: September 15, 2014 23:40 IST2014-09-15T23:40:06+5:302014-09-15T23:40:06+5:30
बॉलीवूडमधील गुणी अभिनेत्री अशी ओळख असलेली अभिनेत्री विद्या बालन सध्या खूप खुश आहे. तिचा आगामी चित्रपट हे तिच्या आनंदामागचे गुपित आहे.

विद्याच्या आनंदामागचे रहस्य
बॉलीवूडमधील गुणी अभिनेत्री अशी ओळख असलेली अभिनेत्री विद्या बालन सध्या खूप खुश आहे. तिचा आगामी चित्रपट हे तिच्या आनंदामागचे गुपित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सुरी करीत आहे. हमारी अधुरी कहानी असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाबाबत विद्या खूप उत्सुक आहे. निर्माते महेश भट्ट विद्या आणि इमरान हाश्मी यांना घेऊन हा चित्रपट बनवत आहेत. या दोघांसह राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचेही सांगण्यात येत आहे. परिणितानंतर प्रेमकथेवर आधारित असलेला हा दुसरा चित्रपट असल्याचे विद्याचे म्हणणो आहे. या चित्रपटाकडून तिला ब:याच अपेक्षा आहेत. इमरान हाश्मीसोबत विद्याचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी या दोघांनी द डर्टी पिक्चर, घनचक्कर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.