बॉलिवूडमधील ‘सिक्रेट अफेअर्स’

By Admin | Updated: April 23, 2017 00:32 IST2017-04-23T00:32:30+5:302017-04-23T00:32:30+5:30

एक काळ असा होता, की,बॉलिवूडमध्ये कुठलेही नाते लपविणे अशक्य होते. मात्र, सद्य:स्थितीत लव्ह अफेअर्स सिक्रेट ठेवणे जणू काही ट्रेंडच बनला आहे. आता तुम्ही म्हणाल

'Secret Affairs' in Bollywood | बॉलिवूडमधील ‘सिक्रेट अफेअर्स’

बॉलिवूडमधील ‘सिक्रेट अफेअर्स’

- Satish Dongare

एक काळ असा होता, की,बॉलिवूडमध्ये कुठलेही नाते लपविणे अशक्य होते. मात्र, सद्य:स्थितीत लव्ह अफेअर्स सिक्रेट ठेवणे जणू काही ट्रेंडच बनला आहे. आता तुम्ही म्हणाल, की या विषयावर आताच सांगण्याचे काय कारण? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, की बॉलिवूडचा सिंघम् अर्थात अजय देवगण आणि रवीना टंडन यांच्यातील त्या वेळेच्या सिक्रेट अफेअर्सचे आता बिंग फुटले असून, त्यावर सर्वदूर खरमरीत चर्चा रंगत आहे. मात्र, अजय आणि रविना हे एकमात्र कपल नाही, ज्यांचे सिक्रेट अफेअर्स होते. असे बरेचसे सेलेब्स आहेत, की ज्यांच्यात सिक्रेट अफेअर्स रंगलेले आहेत. आज आम्ही हेच सिक्रेट अफेअर्स पब्लिकली करणार आहोत...

मधुबाला आणि दिलीपकुमार
सुपरस्टार दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाचे किस्से आजही अनेकांना आठवतात. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते; शिवाय या दोघांची जोडीही प्रेक्षकांना भावत असे. त्या वेळी मधुबालाच्या वडिलांनी दोघांना सेटवर एकमेकांना भेटण्याची अनुमती दिली होती; परंतु बाहेर न भेटण्याची स्पष्ट शब्दात ताकीद दिली होती. १९५७ची गोष्ट आहे. त्या वेळी दोघांना ‘नया दौर’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर जायचे होते. मात्र, मधुबालाच्या वडिलांनी तिला शूटिंगसाठी बाहेर जाण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता. त्यामुळे या चित्रपटातून मधुबालाचा पत्ता कट करण्यात आला होता. तिच्या जागी वैजयंतीमाला यांना संधी दिली गेली. याच ठिकाणी दिलीपकुमार आणि मधुबाला यांच्यातील नात्याचा अंत झाला.

श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती
आज श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती त्यांच्या आयुष्यात जरी खूष असले तरी एक जमाना होता, जेव्हा हे दोघे एकमेकांपासून दूर राहण्याची कल्पनादेखील करीत नव्हते. वास्तविक, त्या वेळी मिथुनने योगिता बाली यांच्याशी विवाह केला होता. अशातही श्रीदेवीसोबतच्या त्याच्या अफेअर्सच्या चर्चा जोरदार रंगत होत्या. परंतु, अखेरपर्यंत या दोघांनी त्यांच्यातील नाते जाहीरपणे स्वीकारले नाही. अखेर श्रीदेवीचा बोनी कपूर यांच्याशी विवाह लावून देण्यात आला.

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त
बॉलिवूडमध्ये संजय दत्तने पहिल्यांदा जर कोणावर प्रेम केले असेल, तर ती लाखो लोकांच्या हृदयाची धक्धक् माधुरी दीक्षित होय. संजय आणि माधुरीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मात्र, ‘खलनायक’च्या सेटवर हे दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु, दोघांनी कधीच त्यांच्यातील नाते उघड केले नाही. पण, त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सातासमुद्रापार रंगायल्या लागल्या होत्या. त्यामुळे हे दोघे आता त्यांच्यातील नाते जाहीर करणारच; तोच १९९३मध्ये संजूबाबाला अवैध शस्त्रास्त्रे बाळगल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. पुढे माधुरी दीक्षितने संजूबाबापासून दूर राहणेच पसंत केले.

शिल्पा शेट्टी आणि अक्षयकुमार
रवीनाबरोबरच अफेयर संपुष्टात आल्यानंतर अक्षयकुमार शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडला होता. मात्र म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते, तसेच काहीसे अक्षयबाबत झाले होते. शिल्पा अक्षयवर जिवापाड प्रेम करीत होती; मात्र त्या वेळी अक्षय ट्विंकल खन्नासोबत सूत जुळविण्याचा प्रयत्न करीत होता. जेव्हा ही बाब शिल्पाला कळाली तेव्हा तिनेही तेच केले जे रवीनाने केले होते. तिने अक्षयला सोडचिठ्ठी दिली. परंतु, त्याचबरोबर ट्विंकलच्या रूपाने अक्षयला खरे प्रेम मिळाले. पुढे दोघांनी लग्न केले असून, ते त्यांच्या आयुष्यात सध्या सुखी आहेत.

जेसिका हाइन्स आणि आमिर खान
आमिर खान याचे अफेयर जेसिका हाइन्स नावाच्या विदेशी पत्रकारासोबत खूपच चर्चेत राहिले आहे. एका साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, आमिर आणि जेसिका यांची भेट ‘गुलाम’ (१९९८) चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांमध्ये अफेअर सुरू झाले अन् दोघेही लिव्ह इन-रिलेशनशिपमध्ये राहू लागले. असे बोलले जाते, की त्या वेळी जेसिका प्रेग्नेंट राहिली होती. तसेच, अबॉर्शनसाठी आमिरने तिच्यावर दबावही टाकला होता. आमिरने जेसिकाला म्हटले होते, की एक तर अबॉर्शन कर; अन्यथा माझ्यासोबतचे नाते विसरून जा! मात्र, जेसिकाने अबॉर्शन करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. पुढे ती लंडनला गेली. सध्या ती सिंगल मदर बनून मुलाचा सांभाळ करीत आहे. तिने मुलाचे नाव ‘जान’ असे ठेवले आहे. मात्र, अजूनही आमिरने या मुलाचा स्वीकार केलेला नाही.

Web Title: 'Secret Affairs' in Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.