स्क्रिप्ट चांगली हवीच

By Admin | Published: September 1, 2014 04:28 AM2014-09-01T04:28:15+5:302014-09-01T06:04:00+5:30

बॉलीवूडचा बाजीराव म्हणजेच अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न्स’ नुकताच येऊन गेला

The script should look good | स्क्रिप्ट चांगली हवीच

स्क्रिप्ट चांगली हवीच

googlenewsNext

बॉलीवूडचा बाजीराव म्हणजेच अजय देवगणचा ‘सिंघम रिटर्न्स’ नुकताच येऊन गेला. सिनेमा फारसा चालला नाही; पण अजय आणि करिनाची केमिस्ट्री मस्त जुळून आल्याची चर्चा रंगतेय; पण खुद्द अजयला मात्र ते मान्य नाही. तो म्हणतो की, केमिस्ट्री म्हणजे काय हेच मला कळत नाही. पिक्चर चांगला चालला तरच हे केमिस्ट्री वगैरे लक्षात येते का? पण मुळात स्क्रि प्टच चांगली नसेल तर कितीही चांगले कलाकार असूनही उपयोग नाही. त्यामुळे केमिस्ट्री वैगेरेचा काहीही परिणाम चित्रपटावर होत नाही. करिना एक हुशार अभिनेत्री असल्याचेही त्याने नमूद केले. तो म्हणाला, मी करिनाला खूप वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे सीन करताना आम्ही एकदम कम्फर्टेबल असतो. ती एक उत्तम अभिनेत्री आहे. ती स्वत:ला स्मार्ट समजत असली तरी, खरं तर ती खूप भोळी, निरागस आहे. तिला गॉसिप्स करायला खूप आवडते. नवीन कलाकारांपैकी काही कलाकार खरोखर गुणी आहेत. ही नवी पिढी खरोखरच कौतुक करण्यासारखे काम करतेय. आता आम्ही जे स्टंटस् करतो ते अनेकदा ग्राफिक्सवर अवलंबून असतात. पुरेशी खबरदारी घेऊन केलेले असतात. नव्या पिढीने शिकण्याची तयारी ठेवावी, असेही त्याने सांगितले.

Web Title: The script should look good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.