पुन्हा आयटम सॉँग करणार चित्रंगदा

By Admin | Updated: July 22, 2014 01:02 IST2014-07-22T01:02:34+5:302014-07-22T01:02:34+5:30

बॉलीवूड अभिनेत्री चित्रंगदा सिंह लवकरच ‘गब्बर’ या चित्रपटात ‘आयटम नंबर’ करताना दिसणार आहे.

Scratching the item again | पुन्हा आयटम सॉँग करणार चित्रंगदा

पुन्हा आयटम सॉँग करणार चित्रंगदा

बॉलीवूड अभिनेत्री चित्रंगदा सिंह लवकरच ‘गब्बर’ या चित्रपटात ‘आयटम नंबर’ करताना दिसणार आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अक्षय कुमारसोबत गब्बर नावाचा एक चित्रपट बनवत आहेत. हा चित्रपट तामीळ भाषेतील ‘रामणा’ या चित्रपटाचा रिमेक आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक क्रिश गब्बरचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात चित्रंगदावर एक आयटम साँग चित्रित केले जाणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी तिने अक्षयचीच मुख्य भूमिका असलेल्या जोकर या चित्रपटात आयटम साँग केले होते. हा चित्रपट फ्लॉप ठरला; पण चित्रंगदाचे आयटम साँग मात्र लोकांच्या लक्षात राहिले. गब्बरमध्ये अक्षय कुमारसह श्रुती हसन, सोनू सूद, प्रकाश राज यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी 23 जानेवारीला रिलीज होणार आहे.

 

Web Title: Scratching the item again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.