"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
By कोमल खांबे | Updated: August 15, 2025 15:16 IST2025-08-15T15:16:21+5:302025-08-15T15:16:52+5:30
प्राजक्ताच्या साखरपुड्याला भोसले राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीने हजेरी लावली होती. याबाबत प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड घराघरात पोहोचली. प्राजक्ताचा नुकताच साखरपुडा पार पडला. अभिनेत्रीने चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही शंभुराज असं आहे. प्राजक्ताच्या साखरपुड्याला भोसले राजघराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तीने हजेरी लावली होती. याबाबत प्राजक्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या साखरपुड्याला संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित राहत दोघांनाही आशीर्वाद दिले. प्राजक्ताने संयोगिताराजे यांना साखरपुड्याला उपस्थित राहण्याची विनंती केली होती. पोस्ट शेअर करत प्राजक्ता म्हणते, "युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचे आशीर्वाद मिळाले. युवराज्ञी माँसाहेब यांना बोलले होते. माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. या नवीन वाटचालीतील पहिल्या शुभकार्याप्रसंगी आपले आशीर्वाद लाभावेत ही खूप मनोमन इच्छा आहे. मी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसेन, तरी आपण नक्की नक्की यावं".
"आणि काय अहो भाग्य आमचं ! सकाळी कोल्हापूरचा कार्यक्रम रद्द करून युवराज्ञी माँसाहेब खास माझ्या विनंतीसाठी आल्या आणि एकच वाक्य म्हणाल्या की….” तुम्ही युवराज्ञीची भूमिका साकारली तर या युवराज्ञीनां येणं भाग पडलं आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला शंभूराजे लाभले, सुखाने संसार करा. मन भरून गेलं आणि त्यांच्या येण्यानं आभाळ ठेगणं वाटलं कारण तेवढा आनंदच झाला होता…खूप खूप मनापासून धन्यवाद", असंही पुढे प्राजक्ताने म्हटलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.