दंगल गर्ल सान्या मल्होत्राने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट,किंमत जाणून तुम्हालाही येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 02:30 PM2021-11-04T14:30:11+5:302021-11-04T14:35:35+5:30

सान्या मल्होत्राने २०१८ मध्येसुद्धा एक फ्लॅट मुंबईत विकत घेतला आहे. अशाप्रकारे आता सान्या एक नाही तर दोन फ्लॅटची मालकीण बनली आहे.  

Sanya Malhotra buys new house in Juhu for ₹14.3 crore, becomes Hrithik Roshan's neighbor | दंगल गर्ल सान्या मल्होत्राने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट,किंमत जाणून तुम्हालाही येईल भोवळ

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने मुंबईत खरेदी केला आलिशान फ्लॅट,किंमत जाणून तुम्हालाही येईल भोवळ

googlenewsNext

मायानगरी मुंबईत आपलं स्वप्नातलं घर  असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते.हे स्वप्नपूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण झटत असतो.प्रत्येकाच्या स्वप्नातील घराच्या कल्पना या वेगवेगळ्या असतात. त्या दृष्टीने आपल्या स्वप्नातलं घर घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती मेहनत करत असतो.याला कलाकार मंडळीही अपवाद नसतात.विशेष म्हणजे आजपर्यंत अनेकदा बॉलिवूड कलाकारांच्याआलिशान घराचे बाहेरील आणि आतील फोटो अनेकदा समोर आली आहेत. आता याच यादीत दंगल गर्ल सान्या मल्होत्रासुद्धा गणली जात आहे. 

दंगल सिनेमातून रसिकांची पसंती मिळवलेली सान्या मल्होत्रासाठी यंदाची दिवाळी जरा खासच आहे. कारण सान्याने मुंबईत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.मुंबईच्या जुहू परिसरात बे व्ह्यू बिल्डींगमध्ये तिने हा फ्लॅट खरेदी केला आहे. मुंबईत घर घ्यायचे म्हटलंय तर त्याची किंमतही थक्क करणारी असते.सान्याच्या या नवीन फ्लॅटची किंमतही थक्क करणारी आहे.सान्याच्या या फ्लॅटची किंमत १४. ५ कोटी इतकी आहे. तर या फ्लॅटसाठी ७१.५ लाख इतकी स्टॅम्प ड्युटी तिला अदा करावी लागली आहे. याच बिल्डींगमध्ये हृतिक रोशनचेही दोन फ्लॅट आहेत. सान्या मुळची दिल्लीची असली तरी मुंबईत सर्वात जास्त सुरक्षित शहर असल्यामुळे तिचे आवडते आहे. गेल्या पाच वर्षापासून ती मुंबईत राहत आहे.यापूर्वी सिंगल बेडरुमच्या अपार्टमेंटमध्ये ती राहत होती. आता मोठं घर  घेतल्यामुळे तिला तिच्या कुटुंबासोबत राहता येणार याच कारणामुळे तिने हा नवीन फ्लॅट विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही तिच्या स्वप्नातला आशियाना असावा अशी तिची ईच्छा होती. सान्याने २०१८ मध्येसुद्धा एक फ्लॅट मुंबईत विकत घेतला आहे. अशाप्रकारे आता सान्या एक नाही तर दोन फ्लॅटची मालकीण बनली आहे.
 
सान्याने दंगल, बधाई हो,पटाखा, शकुंतला देवी,ल्युडो या सिनेमात ती झळकली असून तिच्या भूमिकांनाही रसिकांची चांगलीच पसंती मिळाली होती. आगामी काळात करण जोहरच्या मीनाक्षी सुंदरेश्वर सिनेमातही ती झळकणार आहे. 

Web Title: Sanya Malhotra buys new house in Juhu for ₹14.3 crore, becomes Hrithik Roshan's neighbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.