तुरुंगवारीनंतर 2017मध्ये संजूबाबा करणार कमबॅक
By Admin | Updated: November 1, 2016 12:00 IST2016-11-01T11:57:41+5:302016-11-01T12:00:59+5:30
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.

तुरुंगवारीनंतर 2017मध्ये संजूबाबा करणार कमबॅक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अभिनेता संजय दत्त लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मोठ्या कालावधीनंतर संजू बाबा दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमातून त्याच्या चाहत्यांना भेटणार आहे. अभिजात जोशी हे सिनेमाचे लेखक असून 'मार्को' असे त्याच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. सध्या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनची तयारी सुरू असल्याची माहिती विधू विनोद चोप्रा यांनी दिली आहे. 2017 मध्ये हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.
मामि फेस्टिव्हलमध्ये विधू विनोद चोप्रा यांनी 'मार्को' सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत असल्याची माहिती दिली होती. 'स्क्रिप्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत सिनेमा बनवू शकत नाही. त्यामुळे पटकथा एप्रिलपर्यंत पूर्ण झाल्यास एका आठवड्यातच सिनेमाचे शुटिंग सुरू करणार', असे चोप्रा यांनी सांगितले होते. त्यामुळे सिनेमाचे शुटिंग लवकरच सुरू होईल अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाद्वारे चोप्रा यांची बहीण शैलीदेखील दिग्दर्शनाच्या कारर्किदीला सुरुवात करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी बातम्या
तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजू बाबाचा 'मार्को' हा पहिलाचा सिनेमा असणार आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवरील त्याच्या कमबॅकची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये आतापासूनच वाढली आहे. तुरुंगात जाण्यापूर्वी संजय दत्त आमीर खानसोबत 'पीके' सिनेमामध्ये शेवटचा दिसला होता.