संग्राम आणि खुशबूने केला साखरपुडा !
By Admin | Updated: May 1, 2017 05:35 IST2017-05-01T05:35:43+5:302017-05-01T05:35:43+5:30
तुमच्यासाठी कायपण या संवादामुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. तर खुशबू तावडे

संग्राम आणि खुशबूने केला साखरपुडा !
तुमच्यासाठी कायपण या संवादामुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे. तर खुशबू तावडे मराठी इंडस्ट्रीतच नव्हे, तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकीच प्रसिद्ध आहे. तिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. संग्राम आणि खुशबू या दोघांनाही प्रचंड फॅन फॉलोर्इंग आहे. या दोघांच्या फॅन्ससाठी एक खूपच चांगली बातमी आहे. त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आहे. त्या दोघांनी अत्यंत साधेपणाने साखरपुडा केला असून, त्याचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर फिरत आहेत. संग्राम साळवी आणि खुशबू तावडे हे चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या सांजबहरमध्ये
झळकले होते.