सुलतानच्या सेटवर सलमान-शाहरुखची गळाभेट

By Admin | Updated: March 8, 2016 17:58 IST2016-03-08T17:58:53+5:302016-03-08T17:58:53+5:30

शाहरुख खानने सुलतानच्या सेटवर जाऊन सलमान खानची भेट घेतली आहे. फॅन चित्रपटाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सलमान - शाहरुखचा फोटो शेअर करण्यात आला आहे

Salman-Shahrukh's assault on Sultan's set | सुलतानच्या सेटवर सलमान-शाहरुखची गळाभेट

सुलतानच्या सेटवर सलमान-शाहरुखची गळाभेट

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. ८ - बॉलिवूड बादशहा शाहरुख खान आणि सलमान खानची मैत्री पुन्हा एकदा चर्चेत येऊ लागली आहे. दोघे एकमेकांची भरभरुन स्तुती करत आहेत. शाहरुख खानने सुलतानच्या सेटवर जाऊन सलमान खानची भेट घेतली आहे. फॅन चित्रपटाच्या ट्विटर अकाऊंटवरुन सलमान - शाहरुखचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 
 
बॉलिवूड बादशहा शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपट 'फॅन'मुळे खुप चर्चेत आहे. सलमान खाननेदेखील ट्विटरवरुन मी शाहरुख खानचा जबरा फॅन असल्याचं म्हणलं होतं. सलमान या फोटोमध्ये गाण्याचं शुटींग करत असल्याचं दिसतं आहे. फराह खान या चित्रपटात कोरिआग्राफर म्हणून काम करत आहे. सलमानची सुलतानमधील हिरोईन अनुष्का शर्माने काही दिवसांपुर्वी ही माहिती ट्विटरवरुन शेअर केली होती. 
 
सलमान खानचा सुलतान आणि शाहरुख खानचा फॅन चित्रपट ईदला एकत्र रिलीज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोघे सुपरस्टार बॉक्स ऑफिसवर आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी अजून तारखा घोषित केलेल्या नाहीत. मात्र असं असल तरीही सलमान आणि शाहरुख मात्र एकमेकांचं प्रमोशन करताना दिसत आहेत. शाहरुख खानचे यावर्षी दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. ज्यामध्ये फॅन आणि रईसचा समावेश आहे. तर सलमानचा सध्या फक्त सुलतान हा एकच चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती आहे. 
 
 

Web Title: Salman-Shahrukh's assault on Sultan's set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.