गर्लफ्रेंड लुलिया वंटूरला सलमान खानची कारभेट
By Admin | Updated: January 12, 2016 12:45 IST2016-01-12T12:45:21+5:302016-01-12T12:45:21+5:30
वाढदिवसाच्या पार्टीचा धमाका संपल्यानंतर सलमानने लुलियाला एक कार भेट दिल्याचे बॉलीवूडलाइफने म्हटले आहे.

गर्लफ्रेंड लुलिया वंटूरला सलमान खानची कारभेट
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - सलमान खानची रोमानियन सुंदरी लुलिया वंटूर हिच्याशी जवळिक वाढत असून आता त्यांचे संबंध अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. सलमानच्या कौटुंबिक सोहळ्यात लुलिया हजेरी लावते आणि सलमान जातीने तिची सरबराई करतो असा गेल्या काही महिन्यांतला अनुभव आहे. आता तर नव्या वर्षात, सलमानने नुकतीच एक महागडी कार लुलियाला भेट दिल्याचे वृत्त आहे.
बॉलीवूडलाइफने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानची बर्थडे पार्टी अत्यंत झोकात नुकतीच पार पडली. संपूर्ण रात्रभर लुलियाला कायय हवंय काय नकोय याची काळजी घेताना सलमान दिसत होता. हा वाढदिवसाच्या पार्टीचा धमाका संपल्यानंतर सलमानने लुलियाला एक कार भेट दिल्याचे बॉलीवूडलाइफने म्हटले आहे.
सलमान लुलिया वंटूरशी सीरियस रिलेशनमध्ये असल्याचेच ही कारभेट दर्शवते असं त्याला जवळून ओळखणा-यांचं निरीक्षण आहे.