आता या टीव्ही अभिनेत्रीला लॉन्च करणार सलमान खान
By Admin | Updated: May 4, 2017 21:05 IST2017-05-04T21:05:15+5:302017-05-04T21:05:15+5:30
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमानने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये अनेक नव्या चेह-यांना लॉन्च केलं आहे.

आता या टीव्ही अभिनेत्रीला लॉन्च करणार सलमान खान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे सलमानने आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये अनेक नव्या चेह-यांना लॉन्च केलं आहे. त्याच्यासोबत पहिल्या सिनेमात काम करणा-या अभिनेत्री बॉलिवूडमध्येही खूप नाव कमावतात. आता सलमान आणखी एका नव्या चेह-याला बॉलिवूडमध्ये एन्ट्री देण्याच्या तयारीत आहे. मात्र, आता कोणी मॉडेल किंवा नवीन चेहरा नसून टीव्हीवर नागिन नावाने ओळख असलेला चेहरा आहे. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री मौनी रॉय हिच्याबाबत.
सलमान खान मौनी रॉय हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. मौनी रॉय आणि सलमानमध्ये चांगली मैत्री असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या आहेत. बिग बॉस 10 मध्येही मौनीने परफॉमन्स दिला होता. सलमान मौनीमुळे भलताच इम्प्रेस झाल्याचं वृत्त आहे. सोनाक्षी सिन्हाप्रमाणे मौनी रॉयमध्येही काम करण्याची जिद्द असल्याचं सलमानला वाटतं.
आपल्या होम प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात सलमान मौनीला लॉन्च करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मौनी सध्या कलर्स टीव्हीवरील शो नागिनमध्ये मुख्य भूमिकेत आहे.