सलमान-करिनाची ‘शुद्धी’त जोडी

By Admin | Updated: June 23, 2014 11:12 IST2014-06-23T11:11:25+5:302014-06-23T11:12:40+5:30

करण जोहरच्या ‘शुद्धी’ला अखेर मुहूर्त सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. आता सलमान आणि करिना हे करणच्या मदतीला धावल्यामुळे पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत.

Salman-Kareena's 'Puree' pair | सलमान-करिनाची ‘शुद्धी’त जोडी

सलमान-करिनाची ‘शुद्धी’त जोडी

>करण जोहरच्या ‘शुद्धी’ला अखेर मुहूर्त सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. तब्येतीच्या कारणावरून हृतिक रोशन हा सर्वप्रथम ‘शुद्धी’तून बाहेर पडला होता. त्यानंतर रणवीरसिंहने नकार दिला. करणसोबत झालेल्या मतभेदानंतर करिनादेखील या चित्रपटातून बाहेर पडली. त्यामुळे ‘शुद्धी’ कायमचा डबाबंद होणार काय, अशी चर्चा सुरूझाली होती. आता सलमान आणि करिना हे करणच्या मदतीला धावल्यामुळे पुन्हा आशा निर्माण झाल्या आहेत. ‘बॉडीगार्ड’ मध्ये सलमान आणि करिना एकत्र आले होते. या चित्रपटातील त्यांच्या भूमिका कौतुकास पात्र ठरल्या होत्या. सलमान आणि करिना यांना घेऊन करण लवकरच शूटिंग सुरू करणार आहे.

Web Title: Salman-Kareena's 'Puree' pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.