सलमान ड्रग्ज माफिया तर आलिया कोकेन... अंडरवर्ल्डमधील सांकेतिक नावे उघड

By Admin | Published: January 3, 2017 10:55 AM2017-01-03T10:55:02+5:302017-01-03T12:33:30+5:30

मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांचे फोन संभाषण रेकॉर्ड केले असून त्याद्वारे बलिवूडमधील आघाडीचे कलाकार आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती उघड झाली आहे

Salman Drugs Mafia and Alia Cocaine ... Underworld sign code names | सलमान ड्रग्ज माफिया तर आलिया कोकेन... अंडरवर्ल्डमधील सांकेतिक नावे उघड

सलमान ड्रग्ज माफिया तर आलिया कोकेन... अंडरवर्ल्डमधील सांकेतिक नावे उघड

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - सत्या, कंपनी, वास्तव, शूटआऊट अॅट लोखंडवाला, वन्स अपॉन अ टाईम, ब्लॅक फ्रायडे.. अंडरवर्ल्डमधील गुन्हेगार आणि त्यांचे विश्व, याबद्दल बॉलिवूडमध्ये अशा प्रकारचे अनेक चित्रपट बनले आहेत. दाऊद इब्राहिमपासून ते हाजी मस्तानपर्यंत अनेकांचे आयुष्य चित्रपटात रेखाटण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अंडरवर्ल्डमध्ये वापरण्यात येणार अनेक शब्दही चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेही आहेत. घोडा (पिस्तुल), खोका ( १कोटी), पेटी ( १ लाख रुपये), गेम बजा डाला, सुपारी असे अनेक शब्द आता सर्वांनाच माहित आहेत. 
मात्र चित्रपटसृष्टीवर अप्रत्यक्षरित्या राज्य करणा-या अंडरवर्ल्डमध्ये बॉलिवूडमधील कलाकारांसाठी कोणती सांकेतिक वा टोपण नावं वापरली जातात, हे तुम्हाला माहीत आहे का? मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डमधील गुन्हेगारांचे फोन संभाषण रेकॉर्ड केले असून त्याद्वारे बलिवूडमधील आघाडीचे कलाकार आणि त्यांच्या टोपणनावांची माहिती उघड झाली आहे, त्यामध्ये दंबग स्टार सलमान खान, आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. 
बॉलिवूडचा 'भाई', सुलतान, दबंग स्टार अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा अभिनेता सलमान याच्याविषयी चर्चा करताना त्याला 'ड्रग्ज माफिया' किंवा ' किंगपिन' नावाने संबोधतात. तर सतत उत्साहाने सळसळणारा, बेफिक्रे स्टार रणवीर सिंगचे सांकेतिक नाव आहे ' पेडलर'..
 
पंजाबमधील नशेच्या समस्या ठळकपणे मांडणारा, यंदाचा बहुचर्चित चित्रपट म्हणजे उडता पंजाब.. याच चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट हिला ' कोकेन' या अमली पदार्थाचेच टोपण नाव देण्यात आले आहे. तर कपूर घराण्याचा वारसा पुढे चालवणारा, समर्थ अभिनेता रणबीर कपूरला ' होस्ट' म्हटले जाते. 
तर रणबीरची माजी प्रेयसी आणि सौंदर्यवती अभिनेत्री कॅटरिना कैफचे नामकरण 'स्मॅक'असे करण्यात आले आहे. बॉलिवूड क्वीन आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरण्यात यशस्वी ठरलेली अभिनेत्री कंगना राणावतचे सांकेतिक नाव आहे 'अफीम'..
 
बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही यशस्वी बस्तान बसवलेली 'क्वांटिको' आणि ' बेवॉच'फेम देसी गर्ल प्रियांका चोप्राला ' एलएसडी' या अमली पदार्थाचे नाव देण्यात आले आहे. तर अनुष्का शर्माबद्दल चर्चा करताना अंडडरवर्ल्डमध्ये 'हशीश' हा सांकेतिक शब्द वापरला जातो. या यादीत अभिनेत्री नर्गिस फाक्रीचाही समावेश असून तिच्यासाठी 'एक्स्टसी ’ हा सांकेतिक शब्द वापरण्यात येतो.
 

Web Title: Salman Drugs Mafia and Alia Cocaine ... Underworld sign code names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.