सल्लू म्हणतो, कतरिना ‘मजूर’

By Admin | Updated: February 11, 2016 02:27 IST2016-02-11T02:27:21+5:302016-02-11T02:27:21+5:30

सलमान खान आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतरही दोघांमधील प्रेम कमी झालेले नाही. गोंदियातील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पत्रकार रजत

Sallu says, Katrina 'laborer' | सल्लू म्हणतो, कतरिना ‘मजूर’

सल्लू म्हणतो, कतरिना ‘मजूर’

सलमान खान आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतरही दोघांमधील प्रेम कमी झालेले नाही. गोंदियातील मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पत्रकार रजत शर्मा यांनी सलमान खानला कतरिनाविषयी विचारले. कॅटने आपल्या यशाचे श्रेय सलमानला दिले आहे, तुझे काय म्हणणे आहे? यावर बोलताना सलमान म्हणाला, कॅट जरी हे म्हणत असली तरीही स्वत:च्या कठोर परिश्रमामुळेच ती इथंपर्यंत पोहोचली आहे. तिच्यासारखी कष्ट घेणारी मुलगी मी आजपर्यंत पाहिली नाही. तुमच्यासाठी ती भारतातील सर्वोत्कृष्ट स्टार कलाकार आहे. पण माझ्यामते कॅटरिना ही मजदूर आहे. ती खूप काम करते. तुम्ही सर्वांनी तिच्याकडून शिकण्यासाठी ही गोष्ट आहे.’

Web Title: Sallu says, Katrina 'laborer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.