साराच्या निर्णयाने वाढवली सैफची चिंता!
By Admin | Updated: June 19, 2017 03:04 IST2017-06-19T03:04:08+5:302017-06-19T03:04:08+5:30
सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. पुढच्या वर्षी साराचा पहिला डेब्यू सिनेमा प्रदर्शित होणार आहे

साराच्या निर्णयाने वाढवली सैफची चिंता!
सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. पुढच्या वर्षी साराचा पहिला डेब्यू सिनेमा प्रदर्शित होणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वी साराने अभिषेक कपूरचा ‘केदारनाथ’ हा सिनेमा साईन केला. या सिनेमात सुशांतसिंह राजपूत हा सारा अली खानचा हिरो असेल. साराच्या बॉलिवूड डेब्यूची बातमी ऐकून तुम्ही-आम्ही सुपर एक्साईटेड आहोत; पण साराच्या डॅडला अर्थात सैफ अली खानला मात्र मुलीचा हा निर्णय फार आवडलेला दिसत नाही. ‘होय, साराने बॉलिवूडसारखे असुरक्षित क्षेत्र करिअर म्हणून निवडलेले पाहून सैफ अस्वस्थ आहे. बॉलिवूडपेक्षा साराने अन्य एखाद्या सुरक्षित क्षेत्रात करिअर करावे, अशी सैफची इच्छा होती. पण, साराने नेमका याऊलट निर्णय घेतला. एका मुलाखतीत सैफने साराच्या या निर्णयावर काहीशी काळजी व्यक्त केली. साराच्या बॉलिवूडमधील करिअर करण्याच्या निर्णयाने
मी थोडाचा नव्हर्स आहे. बॉलिवूड हे कमालीचे असुरक्षित क्षेत्र आहे, याची मला काळजी आहे. मी या क्षेत्राला कमी लेखतो आहे, असे मात्र अजिबात नाही. पण, या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येकाने बॉलिवूडमधील असुरक्षितता सहन केली आहे. अथक परिश्रम करूनही येथे यशाची कुठलीही खात्री नाही.’