सैफिनाचा ‘लूक नवाबी’

By Admin | Updated: November 12, 2016 05:07 IST2016-11-12T05:07:13+5:302016-11-12T05:07:13+5:30

घरी नवा पाहुणा येणार असल्याने करिना कपूर व सैफ अली खान सध्या जाम खूश आहेत. करिना कपूर आपल्या प्रेगनेंसीला चांगलेच एन्जॉय करतेय.

Saifina's 'Luc Nawabi' | सैफिनाचा ‘लूक नवाबी’

सैफिनाचा ‘लूक नवाबी’

घरी नवा पाहुणा येणार असल्याने करिना कपूर व सैफ अली खान सध्या जाम खूश आहेत. करिना कपूर आपल्या प्रेगनेंसीला चांगलेच एन्जॉय क रतेय. बहीण करिश्मा कपूर सोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केल्यावर सैफ व करिनाने नवाबी थाटात फोटोसेशन केले आहे. ‘हार्पर बाझार’ या मॅगझिनच्या स्पेशल वेडिंग इश्यूसाठी हे फोटो सेशन करण्यात आले आहे. करिना कपूर प्रेग्नेंट असल्यापासून बॉलिवूडमध्ये तिने नवीन प्रेग्नेंसी ट्रेन्ड सेट केला आहे. अर्थात करिना आपल्या प्रेग्नेंसीचे मार्केटिंग केले नाही. मात्र, फोटोसेशन करून ती चांगलीच चर्चेत आली आहे. यापूर्वी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या परिधानासाठी तिने ‘हॅलो’ मॅगझिनसाठी केलेले फोटोसेशन चांगलेच चर्चेत होते. त्यानंतर तिने एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉकही केला. आता पुन्हा एकदा करिना फ ोटोसेशनच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसमोर आली आहे. यावेळी तिच्यासोबत सैफ अली खानही दिसतोय.
यात दोघांचा लूक राजेशाही थाटातला दिसतो. मासिकाच्या कव्हवरपेजवर सैफ व करिना यांचा फोटो असून ‘ट्रू रॉयल्स’ असे लिहले आहे. कव्हरपेजच्या फोटोमध्ये करिनाने आपले बेबीबम्प लपविले असून एका अन्य फोटोत मात्र तिचे बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे. यासोबतच दोघांचे अनेक फोटो यात दिसत
आहेत. या फोटोसेशनसाठी त्यांनी साब्यासाची मुखर्जी, अनामिका खन्ना, रोहीत बल यांच्यासह अनेक डिझायनर्सनी तयार केलेले वस्त्र परिधान केले आहेत. यात सैफचा लूक नवाबी थाटात तर करिना बेगमच्या लूकमध्ये झक्कास दिसतेय.

Web Title: Saifina's 'Luc Nawabi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.