बेबोसाठी नव्हे तर या महिलेसाठी सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट

By Admin | Updated: March 26, 2017 23:42 IST2017-03-26T22:19:00+5:302017-03-26T23:42:45+5:30

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.

Saif bought 25 crores gift for this woman, not for Bebo | बेबोसाठी नव्हे तर या महिलेसाठी सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट

बेबोसाठी नव्हे तर या महिलेसाठी सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - सैफ अली खान आणि करीनाच्या घरात नुकताच गोडंस पाहुणा आल्यामुळे ते आनंदात आहेत. तैमूरच्या आगमानामुळे त्यांच्या आनंदात चार चाँद लागले आहेत. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानने नुकतेच 25 कोटींचे महागडे गिफ्ट खरेदी केले आहे. पण ते करीना साठी नाही तर त्याच्या आयुष्यातील दुसऱ्या महत्वाच्या महिलेसाठी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सैफ अली खानने आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी हे महागडे गिफ्ट खरेदी केलेय आणि ती व्यक्ती म्हणजे करीनाची आई अर्थात सासू बबितासाठी त्याने 25 कोटींचा नवा फ्लॅट खरेदी केला आहे. बबिता सध्या युनियन पार्क अपार्टमेंटमध्ये राहतात. हे घर करण जोहरच्या घराच्या जवळ आहे. सैफने आपल्या आईला दिलेल्या या गिफ्टमुळे बेबोचा आनंद गगनात मावत नसणार आहे. सैफची मोठी मुलगी सारा खानच्या करियरवरून सैफ आणि करीनामध्ये वाद झाला होता. कदाचित बेबोचा राग शांत करण्यासाठी सैफने सासूबाईंना हे गिफ्ट दिले असेल.

सुत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत समुद्र किनाऱ्याजवळ नवा फ्लॅट पाहत आहेत. नुकताच रणबीर कपूरने 35 करोडमध्ये एक फ्लॅट खरेदी केला आहे.

खाली फोटोमध्ये सैफ अली खान, बबिता, करीना आणि करीश्मा कपूर

Web Title: Saif bought 25 crores gift for this woman, not for Bebo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.