सईची बाईकस्वारी
By Admin | Updated: December 28, 2014 00:20 IST2014-12-28T00:20:02+5:302014-12-28T00:20:02+5:30
आपल्या हटके अभिनयाबरोबरच मॉडर्न कपड्यांसाठीही सई ताम्हणकर प्रसिद्ध आहे. भूमिकेसाठी प्रत्येकवेळी ती काहीना काहीतरी उद्योग करतेच.

सईची बाईकस्वारी
आपल्या हटके अभिनयाबरोबरच मॉडर्न कपड्यांसाठीही सई ताम्हणकर प्रसिद्ध आहे. भूमिकेसाठी प्रत्येकवेळी ती काहीना काहीतरी उद्योग करतेच. ‘प्यार वाली’ चित्रपटासाठी बॉक्सिंग शिकली तेव्हाही खूप चर्चा झालीच. पण आता ‘क्लासमेट’ चित्रपटासाठी तिने चक्क बाईक शिकून घेतलेय. या चित्रपटात तशीही ती टपोरी अप्पूची भूमिका साकारतेय. त्यामुळे बाईक चालवण्याबरोबरच अंकुश चौधरीबरोबर आणखी पंटरगिरी काय करतेय ते कळेलच.