सई मारणार कॅन्डिड गप्पा

By Admin | Updated: October 1, 2016 02:32 IST2016-10-01T02:32:50+5:302016-10-01T02:32:50+5:30

सध्या जमाना वेब सिरीजचा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, आणखीन एका नवा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॅन्डिड गप्पा’ असे या वेब शोचे नाव आहे.

Sai karan kandid chats | सई मारणार कॅन्डिड गप्पा

सई मारणार कॅन्डिड गप्पा

सध्या जमाना वेब सिरीजचा आहे, असेच म्हणावे लागेल. कारण, आणखीन एका नवा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘कॅन्डिड गप्पा’ असे या वेब शोचे नाव आहे. या शोच्या माध्यमातून चक्क सई ताम्हणकर गप्पा मारणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सई नक्की कुणाशी आणि काय गप्पा मारणार? त्याचे उत्तर असे आहे, की सई ही गायिका आणि अभिनेत्री मैथिली पालकरशी या वेब शोमध्ये गप्पा मारणार आहे. कॅन्डिड या वेब शोमध्ये सई ताम्हणकर आणि वंदना गुप्ते आपल्याला दिलखुलासा अंदाजात गप्पा मारताना दिसणार आहेत. सईचा झक्कास अंदाज या वेळी तिच्या चाहत्यांना दिसेल. सईने या शोदरम्यान गप्पांच्या ओघात तिची खूप सारी गुपिते उघडी केल्याचे समजते. आता सईने गप्पांच्या ओघात तिचे नेमके कोणते आणि काय गुपित सांगितले आहे, हे तर आपल्याला कार्यक्रम पाहिल्यावरच कळेल.

Web Title: Sai karan kandid chats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.