Palashichi P.T Movie Review : धावत्या स्वप्नांचं धगधगतं वास्तव

By अजय परचुरे | Published: August 22, 2019 02:24 PM2019-08-22T14:24:48+5:302023-08-08T20:09:54+5:30

आपल्या देशात अशी बरीच उदाहरणं आहेत की उत्तम टँलेट असूनही अनेक खेळाडू खेळात होणाऱ्या राजकारणामुळे ,घरातील पालकांच्या नार्केतेपणामुळे एकतर त्या खेळातूनच बाद झालेत.

Palashichi P.T marathi movie review | Palashichi P.T Movie Review : धावत्या स्वप्नांचं धगधगतं वास्तव

Palashichi P.T Movie Review : धावत्या स्वप्नांचं धगधगतं वास्तव

Release Date: August 23,2019Language: मराठी
Cast: किरण ढाणे,राहुल बेलापूरकर,धोंडीबा कारंडे, तेजपाल वाघ
Producer: ग्रीन ट्री प्रोडकशनDirector: धोंडिबा बाळू कारंडे
Duration: Genre:
लोकमत रेटिंग्स

अजय परचुरे 

आपल्या देशात अशी बरीच उदाहरणं आहेत की उत्तम टँलेट असूनही अनेक खेळाडू खेळात होणाऱ्या राजकारणामुळे ,घरातील पालकांच्या नार्केतेपणामुळे एकतर त्या खेळातूनच बाद झालेत किंवा योग्य संधी, सुविधा न मिळाल्याने आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकले नाहीयेत. भारतातील खासकरून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेळाडूंचा मांडला जाणारा खेळ पळशीची पीटी या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खेळाप्रती शाळेच्या लेवलवरच असलेला निरूत्साह , खेळाडू घडवण्यासाठी शालेय स्तरावर जे आवश्यक ते प्रयत्न करायला हवेत ते न करता खेळाडूंना दाबण्याचाच जो प्रयत्न केला जातोय त्याचा वास्तववादी देखावा म्हणजे पळशीची पीटी हा सिनेमा आहे.

 

पळशीची पीटी सिनेमाची कथा अतिशय वास्तववादी आहे. साताºयाच्या पळशी या अगदीच छोट्या गावातली गरीब धनगर कुटुंबातील मुलगी भागी (किरण धाणे) आपल्या कुटुंबासह माळरानावर राहणारी भागी आपल्या अठराविश्व दारिद्रयाचं ओझं घेऊन रोज माळरानावरून  शाळेत अनवाणी धावत जात असते. गावातली शाळा ही अप्पा पवार (तेजपाल वाघ) या राजकारण्याच्या ट्रस्टमधून चालवण्यात येत असते. शाळेत खेळाविषयी असलेली जाण किंवा त्याविषयी असलेली आस्था ही यथातथाच असते. शाळेचे पीटीचे देशमुख सर ( धोडिंबा कारंडे) यांनाच शारिरीक शिक्षण आणि खेळाविषयी फारशी जाण नसते. त्यातच शाळेत तालुकास्तरावरील शालेश खेळस्पर्धांचे एक लेटर येते. त्यात कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत भाग घेऊन आपली उपस्थिती दाखवण्यासाठी शाळा धावण्याच्या स्पर्धेत आपल्या दोन विद्यार्थीनीना भाग घ्यायला पाठवतात. ज्यात पळण्याच्या शर्यतीत भागीचा सहभाग असतो. आर्श्चयाची बाब म्हणजे मुलींना स्पर्धेसाठी पीटीच्या शिक्षकाऐवजी शाळेत चित्रकलेचे तास देणाºया आणि अपंग असणाºया बिडकर सरांना (राहुल बेलापूरकर) पाठवण्यात येते. यात भागी दुसरी येते. नंतर जिल्हास्तरावर भागी पहिली येते आणि नंतर तिला राज्यस्तरावरील शर्यतीत भाग घेण्याची संधी मिळते. याचदरम्यान तिच्या घरात तिच्या लग्नाविषयीची बोलणी सुरू होतात. एका जत्रेत भागीला  पाहिलेल्या विकासला (राहुल मकदूम) भागी आवडू लागते आणि तो भागीशी लग्न करण्यासाठी हट्ट करतो. एकीकडे राज्यस्तरीय स्पर्धा आणि दुसरीकडे लग्न ,गरीबी याच्याशी झुंजणे या दुष्टचक्रात भागी अडकते. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी येणारी अडचण तिचे मास्तर अर्थात बिडकर सर दूर करतात , ते तिला धावण्यासाठी लागणारे सर्व साहित्य पुरवतात. तिची प्रॅक्टीस करून घेतात मात्र यातही बरेच अडथळे येतात. भागी खरंच नॅशनलला पोहचते का , भागीचे कुटुंबिय तिला खेळाडू होण्यासाठी मदत करतात का , भागी एक खेळाडू म्हणून यशस्वी होते का .. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सिनेमा पाहूनच मिळतील. 



सिनेमाची कथा आणि याचं दिग्दर्शन धोडिंबा कारंडे यांनी केलं आहे. त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. सिनेमाचा विषय अतिशय वास्तववादी आहे. भारतात खेळाडूंची होणारी अवहेलना मांडून दिग्दर्शकांनी चांगला प्रयत्न केला आहे. यातील कलाकारांची निवडही चांगली आहे. पळशी आणि आजूबाजूचा माळरानाचा परिसरही उत्तम चित्रित करण्यात आला आहे. मात्र कथा चांगली असूनही याची मांडणी करण्यात दिग्दर्शक धोडिंबा कारंडे कमी पडले आहेत. खेळाप्रतीची असलेली निस्सीम भावना, किंवा खेळाडूंना होणारा त्रास, त्यांना अगदी शाळास्तरावरूनच न मिळणारी मदत त्याबद्दलची समाजात असलेली चूकीची मानसिकता फक्त संवादातून स्पष्ट होण्यात धन्यता नाही. ती पडद्यावर उत्तमरित्या मांडण्यात जास्त गरजेची आहे. आणि यातच दिग्दर्शक धोडिंबा कारंडे कमी पडले आहेत. कथा, वास्तिवकता जरी योग्य असली तरी सादरीकरण आणि मांडणी यामध्ये दिग्दर्शक सपशेल अपयशी ठरला आहे. काही एरियल दृश्यांचा उगाच केलेला वापरही खटकतो. 

यातील सर्व कलाकारांनी आपली कामं चोख केली आहेत. भागीच्या भूमिकेतील किरण धाणे, राहुल बेलापूरकर, तेजपाल वाघ , धोडिंबा कारंडे ,राहुल मगदूम या कलाकारांनी आपली भूमिका समरसून केली आहे. त्यांचा प्रत्येकाचा प्रयत्न नक्कीच वाखाण्याजोगा आहे. मात्र सिनेमा सादरीकरणात थोडा फसल्याने पळशीची पीटी संपूर्णपणे आपल्याला आनंद देऊ शकत नाही हे वास्तव आहे. तरीही हा सिनेमा त्याच्या कथेसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही.

 

Web Title: Palashichi P.T marathi movie review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.