Jhimma 2 Movie Review : लंडनची टूरटूर, 'बाईपणा'ची हुरहूर, जाणून घ्या कसा आहे 'झिम्मा २'

By संजय घावरे | Published: November 24, 2023 04:42 PM2023-11-24T16:42:07+5:302023-11-24T19:22:27+5:30

Jhimma 2 Movie Review : 'झिम्मा'ने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचा सिक्वेल बनवला आहे. लंडन टूरवर गेलेल्या स्त्रियांच्या गमतीजमती दाखवण्याऐवजी यात त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं आहे

Jhimma 2 Movie Review : The London Tour and Story of Seven Women in Jhimma 2 | Jhimma 2 Movie Review : लंडनची टूरटूर, 'बाईपणा'ची हुरहूर, जाणून घ्या कसा आहे 'झिम्मा २'

Jhimma 2 Movie Review : लंडनची टूरटूर, 'बाईपणा'ची हुरहूर, जाणून घ्या कसा आहे 'झिम्मा २'

Release Date: November 24,2023Language: मराठी
Cast: सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर, अनंत जोग
Producer: ज्योती देशपांडे, आनंद एल. राय, क्षिती जोगDirector: हेमंत ढोमे
Duration: दोन तास १७ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

>> संजय घावरे

'झिम्मा'ने बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर दिग्दर्शक हेमंत ढोमेने या चित्रपटाचा सिक्वेल बनवला आहे. लंडन टूरवर गेलेल्या स्त्रियांच्या गमतीजमती दाखवण्याऐवजी यात त्यांच्या आयुष्यातील प्रश्नांवर भाष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा लंडनच्या भूमीवर बाईपणाच्या नाना 'तऱ्हा'च पडद्यावर पाहतोय की काय असं वाटू लागतं.

कथानक : कबीर पुन्हा एकदा टूरचं आयोजन करतो आणि पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही या चित्रपटातील नायिका लंडन टूरवर निघतात. निर्मला, वैशाली, मीता, तान्या, मनाली यांना घेऊन कबीर लंडनला पोहोचतो. तिथे इंदू, कृतिका आणि अॅलीस्टर त्यांची वाटच बघत असतात. इंदूचा वाढदिवस सर्वजण सेलिब्रेट करतात. नदीवर मासेमारी करण्याकरता जातात. अचानक इंदूला पोहोचण्याची इच्छा होते. इंदू सर्वांचा डोळा चुकवून पाण्यात उतरते. त्यानंतर पुढे काय घडतं ते मध्यंतरानंतर पाहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : मुख्य भूमिकेतील सात जणींच्या आयुष्याची कहाणी हीच या सिनेमाची कथा आहे. काही खुमासदार संवाद हास्य फुलवतात. सिनेमाची सुरुवात वेगवान होते, पण नंतर कथानक पुढे सरकतच नाही. काही प्रसंग पाहताना यंदा रिलीज झालेल्या मराठी चित्रपटाची आठवण येते. सात जणींच्या जीवनातील दु:ख आणि त्यावर फुंकर मारण्याचा हा प्रयत्न आहे. सासू-सुनेचं नातं, वार्धक्यातील आजारपण, नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटेपणाची जाणीव, पैशांची चणचण आणि शारीरिक हानीमुळे इतरांसोबतचा दुरावा यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात छोटीशी कुकिंग स्पर्धाही आहे. गीत-संगीत चांगलं आहे. सिनेमॅटोग्राफी, वातावरण निर्मिती आणि लोकेशन्स सुंदर आहेत, पण परदेशी टूरचं फिलिंग येत नाही. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी लंडनमध्ये जाण्याचा अट्टाहास का केला गेला हे समजत नाही.

अभिनय : निर्मिती सावंतना जास्त वाव मिळाला असून, त्यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. त्या मागोमाग क्षिती जोगचा रोल मोठा आहे. असंख्य स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करणारं हे कॅरेक्टर क्षितीनं लीलया साकारलं आहे. सुहास जोशींनी पुन्हा लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. रिंकू राजगुरूही आपला ठसा उमटवण्यात यशस्वी झाली आहे. सायली संजीवनेही अगदी सहजपणे आपली व्यक्तिरेखा साकारली आहे. शिवानी सुर्वेचं काहीसं गूढ कॅरेक्टर हळूहळू उलगडत जातं. सिद्धार्थ चांदेकरने सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचं काम यशस्वीपणे केलं आहे.

सकारात्मक बाजू : संवाद, अभिनय, लोकेशन्स, कॅमेरावर्क, गीत-संगीत

नकारात्मक बाजू : सिनेमाची गती, पटकथेतील उणीवा, दिग्दर्शन

थोडक्यात काय : या चित्रपटात प्रवासातील गंमतीजंमती कमी आणि वैयक्तीक जीवनातील प्रॉब्लेम्स जास्त अधोरेखित करण्यात आल्याने पाहायचा की नाही हे प्रत्येकाने ठरवायला हवे.

Web Title: Jhimma 2 Movie Review : The London Tour and Story of Seven Women in Jhimma 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.