अर्जुन कपूरबरोबरच्या नात्यावर मलाइकानं अखेर केला खुलासा

By Admin | Updated: May 9, 2017 16:19 IST2017-05-09T16:03:21+5:302017-05-09T16:19:41+5:30

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे.

Revealing that Malikan did the marriage with Arjun Kapoor | अर्जुन कपूरबरोबरच्या नात्यावर मलाइकानं अखेर केला खुलासा

अर्जुन कपूरबरोबरच्या नात्यावर मलाइकानं अखेर केला खुलासा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्यासंबंधी चर्चांना उधाण आलं आहे. मलाइकाचा पती अरबाज खान यानेही अर्जुन कपूरच्या कारणास्तवच तिच्याशी असलेले नाते संपुष्टात आणले आहे. मात्र या चर्चेवर मलाइकाने आता मौन सोडलं असून, पहिल्यांदाच तिने यावर सार्वजनिक वक्तव्य केलं आहे. मलाइका म्हणाली, अर्जुन कपूर आणि माझ्या नात्याविषयी गॉसिप करण्याची काय गरज आहे.

मलाइका, बिपाशा बसू आणि सुजेन खान एका इव्हेंटमध्ये एकत्र आले असता मलाइकानं यावर वाच्यता केली आहे. पत्रकाराने मलाइकाला तिच्या आणि अर्जुनसोबतच्या नात्याविषयी विचारले असता, मलायकानं त्यावर पत्रकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. मलाइकाने सांगितलं की, तुम्ही आमच्याविषयी गांभीर्यानं (बिपाशा आणि सुजेन) बोलायला हवे. आम्ही तिघीही स्वतंत्र महिला आहोत. आम्ही काय करतो, कोणाला भेटतो, आमच्यात काय संवाद होतो, यावर तुम्ही कधीच प्रश्न विचारत नाहीत, मात्र गॉसिप तेवढे करता, असेही मलाइकाने म्हणाली आहे. अर्जुन कपूरसोबतच्या नात्यासंबंधीच्या चर्चेवरही मलाइकाने अतिशय चातुर्यानं उत्तर दिलं आहे.

स्टार प्लसवरील रिअ‍ॅलिटी शो नच बलिए-8 मध्ये मलाइका जजची भूमिका निभावते आहे. या शोमध्ये तिने सोनाक्षी सिन्हाला रिप्लेस केले असून, अर्जुन कपूर या शोमध्ये श्रद्धा कपूरसोबत त्यांच्या हाफ गर्लफ्रेण्ड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. यादरम्यान अर्जुन आणि मलाइकाने एकमेकांसोबत दूर राहणे पसंत केले. त्याच वेळी ते एकमेकांसोबत फारसे बोललेही नाहीत. मात्र अशातही काही फोटोंमध्ये मलाइका आणि अर्जुन एकत्र दिसत असल्याने त्यांच्यातील नात्यावर पुन्हा चर्चा रंगली आहे. मलाइका आणि अर्जुन कपूर यांच्यातील नात्याच्या चर्चा गेल्या वर्षीच्या मे महिन्यांपासून सुरू असून, सलमान खानही याच कारणामुळे अर्जुन कपूरचा राग करतो. बऱ्याचदा हे दोघे एकत्र पाहावयास मिळाल्याने या चर्चांना अक्षरश: उधाण आले आहे. काही फोटोंमध्ये तर हे दोघेही हातात हात घालून फिरत असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Web Title: Revealing that Malikan did the marriage with Arjun Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.