कृतीला सतावतेय घरची आठवण
By Admin | Updated: November 28, 2014 23:23 IST2014-11-28T23:23:31+5:302014-11-28T23:23:31+5:30
‘हिरोपंती’ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी कृती सेनने दिल्लीची आहे. अॅक्टिंग करिअरसाठी ती आता मुंबईला राहते.

कृतीला सतावतेय घरची आठवण
‘हिरोपंती’ या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी कृती सेनने दिल्लीची आहे. अॅक्टिंग करिअरसाठी ती आता मुंबईला राहते. सध्याच्या थंड वातावरणात तिला तिचे दिल्लीतील घर आणि तेथील थंडीची आठवण येत आहे. कृतीने सांगितले की, तिला हिवाळा खूप आवडतो. हिवाळ्यातील थंडीपासून बचावासाठी तिने खास कपडय़ांचीही सोय केली आहे. हिवाळ्यात तिला गरम कोट, जुती आणि हातात सुंदर हातमोजे घालायला आवडतात. कृती एका कार्यक्रमानिमित्त नुकतीच दिल्लीला गेली होती. तेथे तिच्या मित्रंनी तिची खूप मदत केली. कृतीच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सिंह इज ब्लिंग’ आणि ‘फर्जी’ अशा दोन चित्रपटांचा समावेश आहे. पहिल्या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत, तर दुस:या चित्रपटात शाहीद कपूरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. सध्या ती या चित्रपटांच्या तयारीला लागली असून, त्यासाठी किक बॉक्सिंग आणि डान्सची तयारी करीत आहे.