वर्ल्ड कपमुळे टाळले जातेय चित्रपटांचे रिलीज
By Admin | Updated: December 9, 2014 00:51 IST2014-12-09T00:51:28+5:302014-12-09T00:51:28+5:30
सुशांत सिंह राजपूतने महेंद्रसिंह धोनीवर बनत असलेल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे; पण याच क्रिकेटमुळे त्याच्या दुस:या चित्रपटावर परिणाम होईल याची त्याने कल्पनाही केली नसावी.

वर्ल्ड कपमुळे टाळले जातेय चित्रपटांचे रिलीज
सुशांत सिंह राजपूतने महेंद्रसिंह धोनीवर बनत असलेल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे; पण याच क्रिकेटमुळे त्याच्या दुस:या चित्रपटावर परिणाम होईल याची त्याने कल्पनाही केली नसावी. पुढील वर्षी होणा:या क्रिकेट वर्ल्ड कपमुळे सुशांतच्या व्योमकेश बक्शी या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. सूत्रंनुसार क्रिकेट वर्ल्ड कप 2क्15 च्या तारखा घोषित झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला हा चित्रपट 13 फ्रेबुवारीला रिलीज करण्याचे ठरवण्यात आले होते; पण दुस:या दिवशीच म्हणजेच 15 फेब्रुवारीला वल्र्ड कपमध्ये भारत पाकिस्तान मॅच होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट आता 1क् एप्रिलला रिलीज केला जाणार आहे. एखाद्या चित्रपटाच्या एकूण व्यवसायात चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या पहिल्या रविवारच्या व्यवसायाचा 4क् टक्के वाटा असतो. त्यामुळेच या काळात अनेक निर्माते चित्रपट रिलीज करीत नाहीत.