बहुगुणी, बहुरुपी निळू फुले अजूनही स्मरणात

By Admin | Updated: July 13, 2016 10:24 IST2016-07-13T09:59:48+5:302016-07-13T10:24:44+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची आज सातवी पुण्यतिथी. निळू फुले हयात नसले तरी आजही त्यांचे स्थान रसिकप्रेक्षकांच्या ह्दयात कायम आहे.

Recall remembered multinational, polymorphic blue flowers | बहुगुणी, बहुरुपी निळू फुले अजूनही स्मरणात

बहुगुणी, बहुरुपी निळू फुले अजूनही स्मरणात

tyle="text-align: justify;">संजीव वेलणकर
पुणे, दि. १३ - मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची आज सातवी पुण्यतिथी. निळू फुले हयात नसले तरी आजही त्यांचे स्थान रसिकप्रेक्षकांच्या ह्दयात कायम आहे. त्यांनी अडीचशे मराठी चित्रपटात भूमिका केल्या. अष्टपैलू अभिनेते अशी त्यांची ओळख होती. नायक आणि खलनायकी अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका निळू फुले यांनी केल्या. मात्र  त्यांनी रंगवलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोशल मिडियाच्या जमान्यातही प्रेक्षक त्यांचे संवाद विसरलेले नाहीत. 
 
२५ जुलै १९३१ रोजी जन्मलेल्या निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. 
 
अनंत माने दिग्दर्शित ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातील झेलेअण्णांच्या भूमिकेने त्याना चित्रपट व्यवसायात ओळख मिळवून दिली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. 
 
निळू फुले यांची नाटकातील वाटचालीत त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय. तर चित्रपटातील त्यांची वाटचाल खूपच मोठी. ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ हे त्यांचे विशेष चित्रपट होत. व्यावसायिक गरज म्हणून काही चित्रपट स्वीकारणे भाग पडते. ते त्यानी केले तरी भूमिकाना न्याय दिला. 
 
हिंदी भाषेशी जुळवून घेता न आल्याने आपण तेथे फार रमलो नाही असे ते म्हणत. ‘कुली’ चित्रपटात त्यानी अमिताभच्या पित्याची भूमिका साकारली. इतरही काही हिंदी चित्रपटातून त्यानी भूमिका साकारल्या तरी त्यांची ओळख मराठी चित्रपटाचे कलाकार अशी राहिली. पण बराच काळ खलनायक वा दृष्ट वृत्तीचे म्हणून ओळखले गेले. प्रत्यक्षात ते कमालीचे गंभीर प्रवृतीचे. वाचनातून त्यांची मूळ प्रवृती अधिकच जपली गेली. 
 
नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणा-या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणा-या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. मा.निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. मा.निळू फुले यांचे १३ जुलै  २००९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.निळू फुले यांना आदरांजली.
 
निळू फुले यांचा चित्रपटातील प्रवास
 
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
 
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्याव नार्याह जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
 
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के

गाजलेली नाटकं
जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

Web Title: Recall remembered multinational, polymorphic blue flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.