रणवीर म्हणतोय, ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’

By Admin | Updated: November 7, 2016 01:59 IST2016-11-07T01:59:14+5:302016-11-07T01:59:14+5:30

बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगने आता नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. स्वित्झर्लण्ड पर्यटनाचा भारतीय ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून तो काम करणार आहे

Ranveer says, 'A few days later, in Switzerland' | रणवीर म्हणतोय, ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’

रणवीर म्हणतोय, ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’

बॉलीवूडचा ‘बाजीराव’ रणवीर सिंगने आता नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. स्वित्झर्लण्ड पर्यटनाचा भारतीय ‘ब्रँड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून तो काम करणार आहे. पृथ्वीतलावरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लण्डला अधिकाधिक ‘देसी’ पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून त्याने ‘कुछ दिन तो गुजारिए स्वित्झर्लण्ड में’ असे म्हटले तर तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका. तो म्हणतो, ‘यावर्षी मी उन्हाळ्यात स्वित्झर्लण्डला गेलो होतो. या ट्रीपमध्ये मी स्कायडाविंग, पॅराग्लायडिंग यासारखे अनेक अ‍ॅडव्हेंचर्स केले. आता तर मी स्वित्झर्लण्ड पर्यटणाचा अधिकृत ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झालो आहे. हिवाळ्यात बर्फाच्छादित स्वित्झर्लण्ड कसा दिसतो हे पाहण्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. सेंट मॉरित्झ आणि टिट्लिस एंजलबर्गच्या बर्फाळ डोंगरा स्कीर्इंग करणे काय धमाल असेल ना! रणवीर त्याच्या उत्साही, उतावळेपणा, सदैव एनर्जेटिक आणि धडपड्या स्वभावासाठी ओळखला जातो.

Web Title: Ranveer says, 'A few days later, in Switzerland'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.