दीपा मेहताच्या ‘आयलँड’मध्ये रणदीप
By Admin | Updated: July 17, 2014 03:46 IST2014-07-17T03:46:48+5:302014-07-17T03:46:48+5:30
दीपा मेहताच्या ‘आयलँड’ या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट परदेशातही रिलीज करण्याची दीपा यांची योजना आहे

दीपा मेहताच्या ‘आयलँड’मध्ये रणदीप
दीपा मेहताच्या ‘आयलँड’ या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट परदेशातही रिलीज करण्याची दीपा यांची योजना आहे. हिंदीसह इंग्रजी आणि पंजाबीमध्येही हा चित्रपट बनवला जाईल. दीपा म्हणाल्या की, ‘युके’, ‘युएसए’ आणि ‘कॅनडा’सह इतर देशांमध्येही पंजाबी चित्रपटांचे मार्केट वेगाने वाढत आहे. त्यामुळेच हा चित्रपट पंजाबी टायटलसोबत रिलीज करण्याऐवजी पंजाबी भाषेत बनवण्याचे मी ठरवले आहे.’ ‘हायवे’ पाहिल्यानंतर रणदीपला चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतल्याचे दीपाने सांगितले. एका वास्तविक घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटात रणदीप हुडासोबत अनेक इंटरनॅशनल अॅक्टर्सही दिसतील.