'बेफिक्रे'च्या ट्रेलरमध्ये रणवीर, वाणीचा बोल्ड अंदाज

By Admin | Published: October 11, 2016 11:16 AM2016-10-11T11:16:19+5:302016-10-11T11:16:46+5:30

रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलमधून रणवीर आणि वाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Ranbir in 'Biffere' trailer, Bold version of the voice | 'बेफिक्रे'च्या ट्रेलरमध्ये रणवीर, वाणीचा बोल्ड अंदाज

'बेफिक्रे'च्या ट्रेलरमध्ये रणवीर, वाणीचा बोल्ड अंदाज

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलमधून रणवीर आणि वाणीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. याअगोदर चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये रणवीर आणि वाणी किस करताना दिसत होते. चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात आले होते. त्यानुसार प्रेक्षकांची उत्सुकता वाढलीदेखील होती. आदित्य चोप्राने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून ९ डिसेंबरला रीलीज होणार आहे.
रणवीरने यशराज बॅनरखाली 'बँड बाजा बारात' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 'किल दिल', 'गुंडे' आणि 'लेडिज व्हर्सेस रिकी बेहल'मधूनही त्याने यशराजसोबत काम केलं. वाणीनेदेखील यशराज बॅनरखालीच 'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली आहे. 
 

Web Title: Ranbir in 'Biffere' trailer, Bold version of the voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.