मिशेल ओबामांवर राम गोपाल वर्माची वर्णव्देषी टिपण्णी
By Admin | Updated: November 10, 2016 14:14 IST2016-11-10T12:52:03+5:302016-11-10T14:14:24+5:30
दिग्दर्शक राम गोपाल वर्माने मेलेनिया ट्रम्प व मिशेल ओबामा यांची तुलना करत केलेल्या ट्विटमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

मिशेल ओबामांवर राम गोपाल वर्माची वर्णव्देषी टिपण्णी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा दणदणीत पराभव करत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष बनल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. हॉलिवूड, बॉलिवूड सेलिब्रिटींसह नेटीझन्सनीही यावर विविध प्रतिक्रिया नोंदवत नाराजी दर्शवली असतानाच विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणा-या दिग्दर्शक राम गोपाल वर्मानेही वर्णद्वेषी ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावेळी राम गोपाल वर्माने चक्क नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी व अमेरिकेची फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प आणइ माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल यांची तुलना करताना एक ट्विट केले आहे. मात्र त्यामुळे त्यांच्यावर वर्णभेदाचा आरोप होत असून ट्विटरकर त्यांच्यावर तुटून पडले आहे.
(भारतीय वेळेनुसार) काल दुपारी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रामूने लागोपाठ ट्विट्स करत या मुद्यावर मतप्रदर्शन केले. ' काही कारणामुळे मला आधीच्या फर्स्ट लेडीपेक्षा (मिशेल ओबामा) सध्याची फर्स्ट लेडी ( मेलेनिया ट्रम्प) जास्त आवडते. असे का हे कोणी सांगू शकेल का?' असा सवाल मस्करीत विचारत त्यांनी एक स्माईली आणि त्या दोघींचा फोटोही पोस्ट केला.
For some reason I like the present First Lady much more than the previous..can anyone tell me why?