आर. माधवन बॉक्सरच्या भूमिकेत

By Admin | Updated: August 12, 2014 14:42 IST2014-08-12T14:42:14+5:302014-08-12T14:42:35+5:30

सशक्त अभिनेता अशी ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन त्याच्या आगामी चित्रपटात एका बॉक्सर कोचच्या भूमिकेत दिसणार आहे

R. Madhavan boxer's role | आर. माधवन बॉक्सरच्या भूमिकेत

आर. माधवन बॉक्सरच्या भूमिकेत

>सशक्त अभिनेता अशी ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता आर. माधवन त्याच्या आगामी चित्रपटात एका बॉक्सर कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या तामिळ-हिंदी चित्रपटाचे शूटिंग चेन्नईमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटात माधवन बॉक्सिंग कोचच्या रूपात दिसेल. माधवनने ट्विटरवर ही बातमी दिली आहे. तो म्हणतो, ‘ही बातमी मागील दोन वर्षांपासून प्रश्न विचारणार्‍या माझ्या प्रशंसकांसाठी आहे. हो, मी नुकतेच माझ्या आगामी तामिळ-हिंदी चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. मला शुभेच्छा द्या. तामिळमध्ये या चित्रपटाचे नाव धी सुत्रू (शेटवची फेरी) आणि हिंदीत साला खडूस, असे नाव असणार आहे.’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुधा कोंगडा करीत आहेत. सुधा यांनी दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत असिस्टंट म्हणून काम केले आहे.

Web Title: R. Madhavan boxer's role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.