क्वीन बनली चूझी
By Admin | Updated: April 5, 2015 22:56 IST2015-04-05T22:55:42+5:302015-04-05T22:56:03+5:30
कंगनाला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ती चूझी बनली आहे. ‘क्वीन’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना राणावत हिला पुरस्कार जाहीर झाल्यावर

क्वीन बनली चूझी
कंगनाला दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर ती चूझी बनली आहे. ‘क्वीन’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना राणावत हिला पुरस्कार जाहीर झाल्यावर तिचे खूपच कौतुक झाले. आता तिने ‘मि. चालू’ या चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. पुरस्कार मिळण्याआधी कंगना या चित्रपटात काम करण्यास तयार होती. काही दिवसांपूर्वीच सैफ अली खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला. यामुळे रिमा कागतींचा हीरो - हीरोईनचा शोध पुन्हा सुरू झाला आहे.